Home » Blog » Rahul criticise ECI : महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक

Rahul criticise ECI : महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक

राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

by प्रतिनिधी
0 comments
Rahul criticise ECI

नवी दिल्ली : महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी ५४ लाख इतकी असताना महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे झाले? असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत पाच महिन्यात महाराष्ट्रात ३२ लाख मतदार वाढले. हिमाचल प्रदेशाएवढे मतदार अवघ्या पाच महिन्यात वाढले आहेत, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. (Rahul criticise ECI)

नवी दिल्लीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोळाबद्दल राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत घोटाळा झाल्याचा आरोप केला. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले असल्याचा पुनरुच्चाही त्यांनी केला.(Rahul criticise ECI)

राहुल गांधी म्हणाले, २०१९ पासून २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पाच वर्षांत महाराष्ट्रात ३२ लाख नवीन मतदारांची नोंद झाली, पण २०२४ लोकसभा निवडणुकीपासून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे अवघ्या पाच महिन्यात मतदारसंख्या ३९ लाखाने वाढली. वाढ झालेल्या मतदारांची संख्या ही हिमाचल प्रदेशातील मतदारांइतकी आहे. निवडणूक आयोगाने आमच्या प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरुपात दिली पाहिजेत. संपूर्ण देशात निवडणूक आयोगाकडून समान प्रक्रिया राबवली जाते असे सांगितले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची एकत्रित मतदार यादी आम्हाला निवडणूक आयोगाकडून मिळत नसल्याचे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. महाराष्ट्राची मतदारांची संख्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त झाली आहे. मतदार यादीमध्ये उणिवा आहेत. आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेगवेगळ्या मतदार यादा फोटो वोटर लिस्टसह हव्या आहेत. दलित आणि अल्पसंख्याकांची नावे मतदार यादीतून हटवल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्या मागणीला निवडणूक आयोग प्रतिसाद देत नाही असे सांगून महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही विरोधी पक्ष निवडणूक आयोगाकडून पारदर्शी कामाची अपेक्षा करत आहे.(Rahul criticise ECI)

वाढीव मतदारांचा फटका महाविकास आघाडीला बसला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत जितके मतदान महाविकास आघाडीला पडले तितके मतदान विधानसभेत पडले आहे. फक्त भाजपच्या उमेदवाराला लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीला जास्त मतदान पडले आहे. अशी आकडेवारी अनेक विधानसभा मतदारसंघात पहायला मिळते याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

दिल्ली, बिहारमध्येही हाच पॅटर्न

संजय राऊत म्हणाले, निवडणुकीत नवीन पॅटर्न सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मतदान वाढले. तसाच पॅटर्न दिल्ली विधानसभा निवडणुकीत राबवण्याची शक्यता आहे. हे वाढवलेले मतदार कुठून आले. बिहार विधानसभा निवडणुकीतही वाढीव मतदार पॅटर्न राबवला जाईल असे मतही खासदार राऊत यांनी व्यक्त केले.(Rahul criticise ECI)

राष्ट्रवादीच्या ११ उमेदवारांना फटका

निवडणुकीतील मतदानाच्या आकड्यांवरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांनीही विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मारकटवाडी येथील मतदानांवरुन शंका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांचे माजी आमदार राजू पाटील यांच्या गावात त्यांना शून्य मते मिळाली आहेत असा आरोप केल्याकडे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.(Rahul criticise ECI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुतारी वाजवणारा मनुष्य आणि तुतारी या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी तुतारी चिन्ह वगळले नाही. त्याचा फटका आमच्या ११ उमेदवारांना बसला असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने आम्ही केलेल्या तक्रारीनंतर तुतारी ऐवजी फक्त ट्रॅम्पेट असे नाव केले. तुतारी (ट्रॅम्पेट) या चिन्हामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील आमचा उमेदवार निवडून आला, असे महाराष्ट्र सरकारमधील एक मंत्री असलेल्या नेत्याने जाहीर वक्तव्य केले होते याकडेही सुळे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील काँग्रेसचे संघटन अत्यंत खराब
भारतीयांची अमेरिकेतून हद्दपारी आणि नेतृत्वहीन जग

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00