Home » Blog » शिंदेचे खरातला १७ कॉल कशासाठी?; दमानियांचा सवाल 

शिंदेचे खरातला १७ कॉल कशासाठी?; दमानियांचा सवाल 

by प्रतिनिधी
0 comments
Eknath Shinde makes 17 calls to Kharat

जमीर काझी : मुंबई :  महाराष्ट्राचा एपस्टीन समजला जाणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता लैगिक शोषण, गुन्हेगारीपुरती मर्यादित न राहता राजकीय नेतेमंडळी आणि मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. त्याचे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसमवेत गेल्या काही महिन्यात झालेल्या फोन कॉल्सची (सीडीआर) माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला १७ वेळा कॉल केले होते. ते कशासाठी केले हे जाहीर करावे?, असे आव्हान त्यांनी शुक्रवारी केले. (Eknath Shinde makes 17 calls to Kharat)

खरातच्या ‘कॉल डिटेल रेकॉर्ड’चा हवाल्याने धक्कादायक माहिती सार्वजनिक केली असून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,खा.सुनील तटकरे यांच्यासह रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबत शेकडो कॉल झाल्याचा दावा त्यांनी केला.

चाकणकरांच्या बहिणीचे खरातला २३६ कॉल्स

 दमानिया यांनी या प्रकरणात खुलासा करताना त्या म्हणाल्या, सीडीआरमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. चाकणकर यांचे खरातसोबत तब्बल १७७ कॉल्स झाले आहेत. त्यांच्यामध्ये एकूण ३३ हजार ७२७ सेकंद संभाषण झाले होते. चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा यांचे एकूण २३६ कॉल्स खरातला झाले होते. (Eknath Shinde makes 17 calls to Kharat)

केसरकरांचे निकटवर्तीय लोंढेचे १८९ कॉल्स

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे १७ कॉल्स यात १० इनकमिंग, ७ आऊटगोईंग कॉल्स झाले होते. एकदा तर त्यांच्यात तब्बल २१ मिनिटे सलग संभाषण झाल्याचा दावा दमानिया याने केला. त्या म्हणाल्या, आमदार दीपक  केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांचे १८९ कॉल्स असून दोघांमध्ये एकूण ३९हजार ५८९ सेकंद संभाषण झाले.  भाजप नेते चंद्रकांत पाटील (८ कॉल), सुनील तटकरे (८ कॉल), यांचेही खरातसोबत संभाषण झाले  आहे. ही सर्व माहिती आपण एसआयटी आणि  पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिली असल्याचे दमानिया यांनी सांगितले. (Eknath Shinde makes 17 calls to Kharat)

खरातला परदेशातूनही कॉल

दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत, “एखाद्या भोंदू बाबाला राज्याचे उपमुख्यमंत्री १७ वेळा कॉल का करतात? त्यांच्यात २१ मिनिटे काय चर्चा झाली, हे जनतेला समजायला हवे. तसेच रूपाली चाकणकर इतका वेळ खरातशी काय बोलत होत्या? त्यांना तात्काळ अटक करून त्यांची चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की,’ खरातला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर कतार, युएई आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांतूनही मोठ्या प्रमाणावर फोन आले आहेत. “हे केवळ नॉर्मल कॉलचे रेकॉर्ड आहेत, व्हॉट्सअप कॉल्सची संख्या त्याच्या  कितीतरी पटीने जास्त असू शकते,” अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. (Eknath Shinde makes 17 calls to Kharat)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00