Home » Blog » Sansad Ratna Awards : सुळे, गायकवाड, सावंत, बारणे ‘संसदरत्न’

Sansad Ratna Awards : सुळे, गायकवाड, सावंत, बारणे ‘संसदरत्न’

by प्रतिनिधी
0 comments
Sansad Ratna Awards

नवी दिल्ली : लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार), अरविंद सावंत (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासह सतरा खासदारांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. खा. सुळे आणि श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना) यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Sansad Ratna Awards)

भाजपचे रवी किशन आणि निशिकांत दुबे यांचाही ‘संसदरत्न’मध्ये समावेश आहे.

सलग तीन टर्ममध्ये संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल चार विशेष ज्युरी पुरस्कारांचाही समावेश आहे. (Sansad Ratna Awards)

भर्तृहरी महताब (भाजप, ओडिशा), एन के प्रेमचंद्रन (क्रांतिकारी समाजवादी पक्ष, केरळ), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प., महाराष्ट्र) आणि श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र) यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या सर्वांनी १६ व्या लोकसभेपासून उच्च कामगिरी कायम ठेवली आहे.

इतर पुरस्कार विजेत्या खासदारांमध्ये स्मिता उदय वाघ (भाजप), नरेश म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस), मेधा कुलकर्णी (भाजप), प्रवीण पटेल (भाजप), विद्युत बरन महातो (भाजप) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचा समावेश आहे. (Sansad Ratna Awards)

समिती श्रेणीमध्ये, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्त स्थायी समिती आणि डॉ. चरणजित सिंह चन्नी (काँग्रेस) यांच्या अध्यक्षतेखालील कृषी स्थायी समिती यांना त्यांच्या अहवालांच्या गुणवत्तेसाठी आणि कायदेविषयक देखरेखीतील योगदानासाठी गौरवण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00