Home » Blog » Protection for wedding procession: दलित तरुणाच्या लग्नाची मिरवणूक बंदोबस्तात

Protection for wedding procession: दलित तरुणाच्या लग्नाची मिरवणूक बंदोबस्तात

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील घटना

0 comments
Protection for wedding procession

राजसमंद (राजस्थान) : समाज अद्याप जातीपातीच्या जोखडात आणि वर्णवर्चस्वाखाली किती दबला गेला आहे याची उदाहरणे रोज कुठे ना कुठे पाहायला, ऐकायला मिळतात. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. दलितांच्या लग्नात नवऱ्याची मिरवणूक घोड्यावरून काढायची नाही, असा अलिखीत नियम. तो मोडल्यास संबंधित कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रकार. अशीच शक्यता वाटल्याने लग्न समारंभ असलेल्या घरातील लोकांनी थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागितली. (Protection for wedding procession)

आयोगाने तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून संबंधित कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले. त्यानंतर या नवरदेवाची शनिवारी मिरवणूक घोड्यावरून थाटात पार पडली. रविवारी त्याचे लग्न होणार आहे. दरम्यानच्या काळात गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. (Protection for wedding procession)

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील तरवाडा गावातील ही घटना आहे. एका दलित कुटुंबाने लग्नाच्या मिरवणुकीसाठी पोलिस संरक्षण मागितले.राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानेही त्याची दखल घेतली.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वराचा भाऊ सुरेश बामनिया यांनी जिल्हा पोलिसांना पत्र लिहून त्यांच्या भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी पोलिस संरक्षण मागितले. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने त्यांच्या पत्राची स्वतःहून दखल घेतली. बामनिया यांनी आपला युक्तिवाद मांडण्यासाठी २०२२ मधील एका घटनेचा उल्लेख केला. त्यावेळी एका दलित तरुणाच्या लग्नाच्या मिरवणुकीत व्यत्यय आणण्यात आल्याचे त्यांनी  निदर्शनास आणून दिले. (Protection for wedding procession)

शुक्रवारी राजसमंद पोलिस अधीक्षकांना आयोगाने पत्र दिले. या पत्रात आयोगाने पोलिसांना लग्नाच्या मिरवणुकीसाठी कुटुंबाला पुरेसे संरक्षण देण्यास सांगितले होते. तसेच पोलिसांना १५ दिवसांत अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे. शनिवारी लग्नाची मिरवणूक झाली. रविवारी लग्न होणार आहे.

राजसमंदचे पोलिस अधीक्षक मनीष त्रिपाठी यांनी पोलिसांना याबाबतचे पत्र मिळाल्याचे सांगितले. ‘‘आम्ही गावात १७० पोलिस अधिकारी तैनात केले आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्याकडे ड्रोन देखील आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील एका दलित वरावर लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावर बसल्याच्या कारणातून हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे.

हेही वाचा :
उशीरा दाद मागितली म्हणून हक्क नाकारता येणार नाहीत
पर्यटकांवर संभाव्य हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00