Home » Blog » Pothole in Varanasi : पंतप्रधानांच्या वाराणसीत विहिरीएवढा खड्डा

Pothole in Varanasi : पंतप्रधानांच्या वाराणसीत विहिरीएवढा खड्डा

by प्रतिनिधी
0 comments
Pothole in Varanasi

मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात रस्त्यांवर विहिरीएवढा भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यावरुन शिवसेनेचे खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. पंतप्रधान मोदी विदेशात विकासावर प्रवचने देतायेत आणि वाराणसीत ही अशी अवस्था अशी टीका केली. (Pothole in Varanasi)

वाराणसीत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाराणसीतील एका रस्त्यांवर विहिरीएवढा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून अपघातात आमंत्रण मिळत आहे. वाराणसीमध्ये भलामोठा खड्डा पडल्याचे दोन फोटो खासदार राऊत यांनी शुक्रवारी सकाळी एक्स वर शेअर केले आहेत. एका फोटोत रस्त्यांवर विहिरीएवढा खड्डा पडला आहे तर दुसऱ्या फोटोत पंतप्रधान मोदी भोजन घेत आहेत. या फोटोसोबत राऊत यांनी मोदीवर टीका करणारे कॅप्शनही लिहिले आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की “नरेंद्र मोदी सध्या घाना, त्रिनिदाद वगैरे देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे हिंडणे, फिरणे, पर्यटन जोरात आहे! त्यांच्या वाराणसी मतदार संघातल्या रस्त्यांची ही अशी अवस्था आहे! विदेशांत भारताच्या विकासावर प्रवचने, वाराणशीत ही अवस्था! भारताचा विकास विदेश दौऱ्यावर आहे!” अशी टीका राऊत यांनी केली आहे. (Pothole in Varanasi)

वाराणसीची पडलेल्या रस्त्यांबाबत राऊत म्हणाले, आज सोशल मिडियावर वाराणसीतील रस्त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. मोदी यांचा हा मतदारसंघ आहे. तिथून निवडून आलेले सदस्य देशाचे पंतप्रधान आहेत. ते आपल्या मतदारसंघातील रस्ते नीट करु शकत नाहीत. तिथे विकास होत नाही आणि हे विकासपुरुष घाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो अशा महान देशात फिरतायेत. तिथल्या राष्ट्रपतीसोबत जेवणावळ्या झोडताहेत आणि इकडे वाराणसीची जनता त्यांचा शोध घेत आहेत, असेही राऊत म्हणाले.

वाराणसीच्या रस्त्यांवर विहिरीएवढे खड्डे झाले आहेत. या खड्ड्यात एवढे अपघात झालेत की त्याची चर्चाच नाही. कारण वाराणसीचा विकास विदेशात फिरतोय. पंतप्रधान हेलिकॉप्टरने येतात, त्यामुळे त्यांना रस्ते कसे दिसतील? असा खोचक सवालही राऊत यांनी केला. (Pothole in Varanasi)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00