Home » Blog » Party at DM’s banglow : कलेक्टरांच्या बंगल्यातील पार्टी पोलिसांना भोवली

Party at DM’s banglow : कलेक्टरांच्या बंगल्यातील पार्टी पोलिसांना भोवली

by प्रतिनिधी
0 comments
Party at DM’s banglow

बालासोर: ओडिशातील बालासोर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत निवासस्थानी बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनी रंगीत संगीत पार्टी केली.  ही पार्टी पोलिसांना चांगलीच भोवली असून अनधिकृत पार्टी आयोजित केल्याबद्दल आणि मद्यपान केल्याबद्दल पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. (Party at DM’s banglow)

दारू पिऊन गणवेशात नाचणाऱ्या पोलिसांचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक राज प्रसाद यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हवालदार हेमंता बारीक आणि कॉन्स्टेबल सिद्धेश्वर गोछायत, देबा माझी, सुधांशू जेना आणि रामचंद्र तपस्वी यांचा समावेश आहे. (Party at DM’s banglow)

एक जून रोजी रात्री जिल्हाधिकारी सूर्यवंशी मयूर विकास हे अधिकृत ड्युटीवर असताना ही घटना घडली. सुरक्षा राखण्याऐवजी, अधिकाऱ्यांनी गार्ड रूममध्ये मांसाहारी जेवण, दारू आणि मोठ्या आवाजात संगीत असलेली पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. गार्ड रुममध्ये तपास अधिकाऱ्यांना बिअर कॅन आणि दारूच्या बाटल्या सापडल्या, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (Party at DM’s banglow)

एसपी प्रसाद यांनी याबाबत असे म्हटले आहे की , “उच्च सुरक्षा असलेल्या सरकारी आस्थापनांमध्ये तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शिस्त उच्च पातळी राखली पाहिजे. पोलिसांच्या कोणत्याही गैरवर्तनासाठी कठोर कारवाई केली जाईल.”

या घटनेची चौकशी करण्यासाठी एका पोलिस उपअधीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशीच्या निष्कर्षांवरून पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. या घटनेमुळे जिल्ह्यातील उच्चपदस्थ सरकारी आस्थापनांमधील सुरक्षा प्रोटोकॉलबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. (Party at DM’s banglow)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00