Home » Blog » Shinde offers flight : किडनी रुग्णाच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे; स्वत:च्या विमानाने नेले मुंबईला

Shinde offers flight : किडनी रुग्णाच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे; स्वत:च्या विमानाने नेले मुंबईला

by प्रतिनिधी
0 comments
Shinde offers flight

जळगाव : प्रतिनिधी : किडनी प्रत्योरोपणासाठी मुंबईला जाणारे विमान चुकल्याने रुग्णाचे कुटुंब चिंतेत पडले. पण उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार्टर्ड विमानातून रुग्णाला नेले आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. उप मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय करुन दिल्याचे पहायला मिळाले. (Shinde offers flight)

उप मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासाठी खास विमानाने गेले होते. पण ते मुंबईला परताना किडनी प्रत्यारोपण रुग्ण शीतल पाटील यांना खास विमानाने घेऊन आले.
जळगाव जिल्ह्यातील शीतल पाटील यांना किडनी प्रत्यारोपणासाठी तत्काळ मुंबईला पोहोचणे आवश्यक होते. पण त्या विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच मुंबईचे विमान निघून गेले होते. त्यामुळे शीतल पाटील निराश झाल्या. दरम्यान विमानतळावरील काही कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना शीतल पाटील यांच्यासमोर निर्माण झालेली समस्या सांगितली. त्यानंतर महाजन यांनी जळगावात असलेल्या उप मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्क साधून शीतल पाटील यांची समस्या सांगितली, आणि त्यांना मुंबईला घेऊन जाण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता शिंदे यांनी होकार दिला. ‘माझ्या दोन अधिकाऱ्यांना जळगावात ठेवीन आणि माझ्या बहिणीला सोबत घेऊन जाईन’, असे त्यांनी महाजन यांना सांगून दिलासा दिला. (Shinde offers flight)

दरम्यान महाजन यांनी शीतल पाटील यांच्याशी संपर्क साधून उप मुख्यमंत्री शिंदे यांच्या खास विमानातून मुंबईला जाण्याची सोय झाली आहे असे सांगताच त्यांनी सुटकेचा निश्वा:स सोडला. मुंबईच्या प्रवासात यांनी शीतल पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या उपचाराविषयी माहिती घेतली. तसच मुंबईत पोहोचताच विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन दिली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. (Shinde offers flight)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00