Home » Blog » Panchganga Hospital : पंचगंगा हॉस्पिटल राज्यात प्रथम

Panchganga Hospital : पंचगंगा हॉस्पिटल राज्यात प्रथम

by प्रतिनिधी
0 comments
Panchganga Hospital

कोल्हापूर  :  महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत शहरातील नागरीकांना वैद्यकीय सेवा गुणात्मक व दर्जात्मक देण्यासाठी शासनामार्फत कायाकल्प ही योजना राबविण्यात येते. २०२४-२०२५ मध्ये कायाकल्प पुरस्कारासाठी नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र संवर्गामध्ये शुक्रवार पेठेतील श्री पंचगंगा रुग्णालयाचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र या संवर्गामध्ये आयसोलेशन आरोग्य केंद्रास राज्यात व्दितीय क्रमांक जाहीर झाला आहे. यामध्ये श्री पंचगंगा रुग्णालयास १५ लाख व आयसोलेशन आरोग्य केंद्रास दोन लाख पुरस्काराची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. हा पुरस्कार घेण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त पंडित पाटील व आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांच्या नियोजनाखाली सर्व प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, संबंधित आरोग्य संस्थाचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले. (Panchganga Hospital)

                महानगरपालिकेच्या श्री पंचगंगा व सावित्रीबाई फुले हॉस्पिटल या नागरी सामुदायिक आरोग्य संस्था व ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत शासन निर्देशानुसार वेगवेगळे राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत रूग्णालयाची व नागरी प्राथमिक आरोग्य संस्थेमध्ये परिसर स्वच्छता, दर्जात्मक सेवा, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. या आरोग्य संस्थेचे मूल्यांकन राज्य स्तरावरील समितीमार्फत करण्यात येते. (Panchganga Hospital)

                श्री पंचगंगा हॉस्पिटल व सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचे राज्य शासनाच्या समितीव्दारे मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र संवर्गामध्ये श्री पंचगंगा रुग्णालयास राज्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच १५ लाख पुरस्काराची रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. याचबरोबर सावित्रीबाई फुले रुग्णालयास राज्यात प्रोत्साहनात्मक पुरस्कार प्राप्त झाला आहे. या रुग्णालयास एक लाख पुरस्काराची रक्कम जाहीर झालेली आहे.

                याशिवाय प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र या संवर्गामध्ये आयसोलेशन आरोग्य केंद्रास राज्यात व्दितीय क्रमांक जाहीर झाला असून, दोन लाख पुरस्काराची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत सर्व आरोग्य केंद्रे सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपूरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, फुलेवाडी, सदरबाजार, सिध्दार्थनगर, मोरे-माने नगर या कायाकल्प योजनेअंतर्गत पात्र झालेल्या असून या केंद्रांना प्रत्येकी ५० हजार पुरस्काराची रक्कम शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. (Panchganga Hospital)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00