Home » Blog » महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर

महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर

by प्रतिनिधी
0 comments
Rajesh Latkar as Leader of Opposition

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश भरत लाटकर यांची निवड करण्यात आली. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वी महानगरपालिकेत छाप पाडली. लाटकर यांच्या पत्नी सुरमंजरी लाटकर यांनी महापौरपदही भूषवले आहे. (Rajesh Latkar as Leader of Opposition)

आज बुधवारी काँग्रेसचे गटनेते इंद्रदीज बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदासाठी लाटकर यांची नियुक्ती करावी असे पत्र दिले आहे. यावेळी उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते.

महानगरपालिकेत काँग्रेसचे ३४ नगरसेवक निवडून आले आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी राजेश लाटकर यांना विरोध पक्षनेतेपदाची संधी दिली आहे. लाटकर यांनी यापूर्वी महानगरपालिकेत स्थायी समितीपद भूषविले आहे. २०२४ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. (Rajesh Latkar as Leader of Opposition)

काँग्रेसच्या शिष्टमंडळात माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते नगरसेवक सुभाष बुचडे, प्रविण केसरकर, प्रतापसिंह जाधव, विनायक फाळके, अमर समर्थ, दुर्वास कदम, नगरसेविका जयश्री चव्हाण यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकेंचा सहभाग होता. (Rajesh Latkar as Leader of Opposition)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00