Home » Blog » Pakistan’s preparation: पाकिस्तानची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीची तयारी

Pakistan’s preparation: पाकिस्तानची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीची तयारी

पाकिस्तानकडून रोज युद्धबंदीचे उल्लंघटन

0 comments
Pakistan's preparation

इस्लामाबाद : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत आहे. तशा बातम्या प्रसृत झाल्या आहेत. ही कृती म्हणजे ‘‘चिथावणीखोरीची बेपर्वा कृती आणि भारताविरुद्धच्या शत्रुत्वाच्या मोहिमेत धोकादायक वाढ’’ असे मत सामरिक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (Pakistan’s preparation)

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नियोजित क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे ‘‘भारतासोबत तणाव वाढवण्याचा एक हताश प्रयत्न’’ असे सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व वाढले आहे. पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर (एलओसी) जवळजवळ दररोज युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे. भारतीय सैन्य या चिथावणीला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. (Pakistan’s preparation)

पहेलगाम हल्ल्यानंतर, सीमापार दहशतवादाला पाठिंबा आणि निधी देण्याच्या भूमिकेमुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक दंडात्मक उपाययोजनांची घोषणा केली.

राजनैतिक उपाययोजनांमध्ये राजनैतिक संबंध कमी करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा निलंबित करणे आणि अटारी सीमा बंद करणे आदी पावले उचलली आहेत. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार देखील निलंबित केला. त्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने ही ‘‘युद्धाची कृती,’’ असे म्हटले आहे. (Pakistan’s preparation)

पहेलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताकडून लष्करी कारवाईची भीती पाकिस्तानलाही आहे. या हल्ल्यात पाकचा माजी लष्कर कमांडो हासीम मूसा यांच्यासह किमान दोन पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.

भारताने पहेलगाममधील हल्लेखोरांना, त्यांच्या पाठीराख्यांना आणि हल्ल्याच्या योजना आखणाऱ्यांना जबर शिक्षा देण्यात येईल, असा इशारा दिला आहे. मात्र पाकिस्तानविरोधात कारवाई कोणती असणार याबाबत काहीही उघड भाष्य केलेले नाही.

तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना निर्णय घेण्यासाठी पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिले आहे. पहलगाम हल्ल्यात किमान २६ नागरिक ठर झाले. मृतांमध्ये देशभरातील पर्यटकांचा समावेश होता. हा या दशकांमधील नागरिकांवर झालेला सर्वांत मोठा हल्ला होता. मृतांमध्ये एक स्थानिक आणि एक नेपाळी नागरिक देखील होता.

हेही वाचा :
कर्नाटकचा मंत्री म्हणाला, मी युद्धावर जातो…
पाकिस्तानवर आयात बंदी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00