Home » Blog » ७० वर एनसीसी कॅडेट्सना अन्नातून विषबाधा

७० वर एनसीसी कॅडेट्सना अन्नातून विषबाधा

कोचीजवळ आयोजित शिबिरादरम्यान घटना

by प्रतिनिधी
0 comments
NCC cadets

कोची : ७० हून अधिक एनसीसी कॅडेट्सना विषबाधा झाली. थ्रिक्काकरा येथील केएमएम कला आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित शिबिरादरम्यान ही घटना घडली. या सर्व कॅडेट्सना एर्नाकुलम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर दोन खागी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (NCC cadets)

सोमवारी दुपारच्या जेवणानंतर अनेक विद्यार्थ्यांना अस्वस्थता जाणवू लागली. सायंकाळपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. बहुतेकांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तर अनेकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. (NCC cadets)

अनेक विद्यार्थ्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यानंतर रुग्णवाहिका मागवण्यात आल्या. शिवाय पोलिस वाहनांतूनही रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकांना याबाबतची माहिती समजताच त्यांच्यातही घबराट पसरली. अनेक पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

सोमवारी रात्री पालकांनी एनसीसी शिबिराच्या ठिकाणी जोरदार आंदोलन केले. त्यानंतर शिबिर रद्द करण्यात आले. करीमक्कडू विभागाचे नगरसेवक दिनूब टी जी यांनी सांगितले की, दह्यापासून बनवलेल्या करीमधून विषबाधा झाल्याचा संशय आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये जेवण तयार करण्यात आले होते.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00