कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या दौऱ्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानी जोरदार विरोध केल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. ओवेसी यांनी एमआयएम कार्यालयाचे उद्घाटन टाळल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. दरम्यान ओवेसी यांच्या दौऱ्यावर वाद निर्माण करणाऱ्या लोकांवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली. शाहू महाराज यांच्या नगरीत हिंदू मुस्लीम वाद लावत आहेत अशी टीका त्यांनी केली. (Opposition to Owaisi’s visit)
खासदार ओवेसी आज कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांच्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील होते. ओवेसींचे जोरदार स्वागत करण्यात आले. ओवेसी यांच्या हस्ते बागल चौकातील एमआयएम पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. तसेच ओवीसी बागल चौकातील मशिदीत नमाज पठण करणार होते. त्याला हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. सकाळी दहा वाजल्यापासून बागल चौकात हिंदूत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ओवेसी हे स्फोटक विधान करतात. सध्या कोल्हापूरात नवरात्रोत्सव सुरू असून त्यांच्या वक्तव्याने परिस्थिती बिघडू नये यासाठी हिंदूत्ववाद्यांचा विरोध आहे असे स्पष्टीकरण हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी केले. पण बागल चौकातील खासदार ओवेसी यांनी कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर परिसरात तणाव निवळण्यास मदत झाली. (Opposition to Owaisi’s visit)
दरम्यान ओवेसी यांचे कोल्हापूरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार जलील यांनी विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले राजर्षी शाहू यांनी केलेले कार्य मी पुस्तकातून वाचले आहेत. त्याच शाहू महाराजांच्या नगरीत हिंदू मुस्लीम वाद लावत आहेत अशी टीका केली.
आय लव्ह मोहम्मदवर यावर बोलताना जलील म्हणाले, आपण जर भगवान रामावर प्रेम करत असाल आणि ‘आय लव्ह राम’ म्हटलं तर त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्याच पद्धतीने ‘आय लव्ह मोहम्मद’ जर कोण म्हणत असेल तर त्यांच्या विचारांवर देखील चालले पाहिजे.
ते म्हणाले, १५ मिनिटे पोलिस बाजूला करा हे वक्तव्य अकबरुद्दीन आवेसी यांनी २०१२ मध्ये केले होते. त्याबद्दल त्यांना शिक्षा देखील झाली आहे. पण अनेक नेते यापेक्षा गंभीर बोलतात. बाळासाहेब ठाकरे, प्रविण तोगडिया हेही स्फोटक बोलत होते. कोकणातील एक नेता मुस्लिमांना कसे बोलतो हे ऐकले आहे. हा देश कुणाच्या बापाचा नाही असेही ते म्हणाले.
एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणूका लढवणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या सगळ्या निवडणूक आम्ही लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या पक्षाबरोबर कोणताही पक्ष युती करणार नाही. एमआयएम एकटा लढणार आहे. (Opposition to Owaisi’s visit)