Home » Blog » Murder in Aptenagar : पतीने केला पत्नीचा गळा चिरुन खून

Murder in Aptenagar : पतीने केला पत्नीचा गळा चिरुन खून

by प्रतिनिधी
0 comments
Murder in Aptenagar

कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्जाऊ घेतलेल्या पैशाच्या कारणांवरुन पत्नीने पत्नीचा गळा दाबून आणि चाकूने गळा चिरुन खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अस्मिता परशुराम पाटील (वय ४१) असे खून झालेले महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर पती परशुराम पाटील स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेने आपटेनगर पोद्दार हायस्कूलच्या मागील परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Murder in Aptenagar)

आपटेनगर परिसरात असलेल्या इंगवले माळ  येथे रहात असलेल्या परशुराम पाटील याने पत्नी अस्मिता पाटील.हिच्याशी आर्थिक कारणातून वाद घालत रागाच्या भरात पत्नी अस्मिता हिचा गळा दाबून चाकूने गळा चिरुन हत्या केली. हा प्रकार मंगळवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. परशुराम पाटील हे आपल्या कुंटुबिया समवेत भाड्याने रहात असून ते एका खाजगी कारखान्यात नोकरी करत होते. त्यांच्या पत्नीने ओळखीतून व्याजाने पैसे घेतले होते.घेतलेल्या पैशाच्या कारणातून पती पत्नीत वाद झाला.हा वाद वाढ़त गेल्याने पती  परशुराम पाटील याने पत्नी अस्मिता हिचा खून करून स्वतःच करवीर पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेची माहिती करवीर पोलिसांना मिळाली असता करवीर पोलिस घटना स्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.तेथे सदरच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. आरोपी परशुराम पाटील यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.याचा पुढील तपास करवीर पोलिस करीत आहेत. (Murder in Aptenagar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00