Home » Blog » Karur rally  : तामिळ सुपरस्टार विजय याच्या प्रचार रॅलीत चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा ४०

Karur rally  : तामिळ सुपरस्टार विजय याच्या प्रचार रॅलीत चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा ४०

by प्रतिनिधी
0 comments
Karur rally

चेन्नई :  करुर येथे शनिवारी सायंकाळी टीव्हीके नेते, तामिळ फिल्म सुपरस्टार विजय यांच्या  प्रचारात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ४० पर्यंत गेला आहे. ( Karur rally)

करूर येथे टीव्हीके अध्यक्ष विजय यांच्या प्रचारात अनेकजणांच्या मृत्यू झाल्याच्या वृत्तांवर चिंता व्यक्त करताना, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना गर्दीत बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना त्वरित वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले. स्टॅलिन यांनी ट्विट केले की त्यांनी माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम आणि करूर जिल्हाधिकारी यांना प्राधान्याने उपचारांवर देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोयमोझी यांना “युद्धपातळीवर” मदत करण्यास सांगितले. परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलण्यासाठी त्यांनी एडीजीपीशी बोलल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले. परिस्थिती हाताळण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेंगराचेंगरीतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला. “तामिळनाडूतील करूर येथे राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. ( Karur rally)

मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन रात्री करुर येथे कुटुंबीयांची भेटले आणि रविवारी सकाळी चेन्नईला परतण्यापूर्वी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, मृतांचा आकडा ४० वर पोहोचला आहे. यामध्ये १० मुले आणि १७ महिलांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३० बळींचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे आणि मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत. (Karur rally)

रविवारी (२८ सप्टेंबर २०२५) पोलिस सूत्रांनी पुष्टी दिल्यानंतर करूर चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ४० वर पोहोचला आहे. करूरमधील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एक महिला चौकशी आयोगाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीसन यांनी रविवारी (२८ सप्टेंबर) करूरमधील वेलुसामीपुरम येथे शनिवारी झालेल्या सभेच्या ठिकाणी भेट देऊन चौकशी सुरू केली.

नंतर एका सोशल मीडिया पोस्टमध्ये विजय यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. “प्रियजनांना गमावण्याचे दुःख शब्दातीत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये आणि उपचार घेत असलेल्या जखमींना २ लाख रुपये देण्याची घोषणाही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफमधून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये सानुग्रह मदत जाहीर केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

द्रमुक संसदीय पक्षाच्या नेत्या कनिमोळी यांनी घरोघरी जाऊन मृतांच्या कुटुंबीयांना भेट दिली. नातेवाईकांचे सांत्वन केले. सरकारने जाहीर केलेल्या १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेशही त्यांनी नातेवाईकांकडे सुपूर्द केला.

न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्याकडून चौकशी सुरू

न्यायाधीश अरुणा जगदीसन यांनी रविवारी करूर येथील वेलुसामीपुरम येथे सभेच्या ठिकाणी भेट देऊन चौकशी सुरू केली. तामिळनाडू सरकारने चेंगराचेंगरीला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर ही भेट घेण्यात आली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00