महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल विरोधकांनी निषेध नोंदवला. दरम्यान भाजपच्या युवा मोर्चाच्या पदिधिकाऱ्यांनी मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केली. या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. (Mumbai)
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केला. यावेळी सुरूवातीला पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाहीफेक केली. त्यानंतर कार्यालयातील खुर्च्या फेकून दिल्या. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून राजकारण : संजय शिरसाट
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. बाबासाहेबांच्या नावावर लोक राजकारण करत आहेत. बाबासाहेबांचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व उत्तुंग होते. त्यामुळे त्यांच्या नावाने राजकारण करणं योग्य नाही. घटनेचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे” (Mumbai)
हेही वाचा :
- Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळवून देण्यासाठी २० टक्के निर्यातशुल्क हटवा
- Amit Shah : अमित शहांविरोधात दोन विशेषाधिकार नोटिसा
- राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी निवड