नवी दिल्ली : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीचा लोकांची घुसखोरी झाली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणार आहे असे ते म्हणाले. नवी दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमलनानिमित्त एक पत्रिका प्रकाशित करण्यात आली. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Infiltration of reactionary elements into the Warkari sect)
वारकरी संप्रदायाबद्दलही शरद पवार म्हणाले, “वारकरी संप्रदायासारथ्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल, अशा पद्धतीने मांडणी करतात. त्यामुळे आता आम्ही यादी करायला सुरूवात केली आहे. आता साधारण चाळीसएक लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायात कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडताना दिसतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाही,” अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे. (Infiltration of reactionary elements into the Warkari sect)