Home » Blog » Mayank Yadav : मयंक यादव आयपीएलबाहेर

Mayank Yadav : मयंक यादव आयपीएलबाहेर

पाठीच्या दुखापतीमुळे लखनौच्या उर्वरित सामन्यांना मुकणार

by प्रतिनिधी
0 comments
Mayank Yadav

लखनौ : आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्सकडून खेळणारा भारताचा वेगवान गोलंदाज मयंक अगरवालच्या पाठीची दुखापत पुन्हा बळावली आहे. या दुखापतीमुळे तो लखनौच्या उर्वरित सामन्यात खेळू शकणार नसल्याने त्याच्याजागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम ऑरुर्केला करारबद्ध करण्यात आले आहे. (Mayank Yadav)

मागील वर्षीपासूनच दुखापतींनी मयंकचा पिच्छा पुरवला आहे. आयपीएलच्या मागील मोसमातही तो लखनौकडून केवळ चार सामनेच खेळू शकला होता. असे असतानाही मागील वर्षी नोव्हेंरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावावेळी लखनौने त्याला मुक्त न करता आपल्याकडे ठेवले. पाठीच्या दुखापतीमुळे मयंकला मागील वर्षी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासूनही दूर राहावे लागले होते. यंदाच्या आयपीएल मोसमातही मयंक दुखापतीतून सावरत असल्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. तो दुखापतीतून सावरल्यानंतर बीसीसीआयच्या बेंगळुरू येथील सेंटर फॉर एक्सलन्स (पूर्वीची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) येथे सराव करत होता. यावेळी तो मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोनच संघांविरुद्ध सामने खेळला. त्यानंतर, पायाचा अंगठा पलंगाला आपटल्यामुळे दुखापत होऊन त्याला काही सामन्यांना मुकावे लागले. आता पाठीच्या दुखापतीमुळे तो पुन्हा आयपीएलबाहेर गेला आहे. (Mayank Yadav)

मयंकच्या जागी निवड झालेल्या ऑरुर्केने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५ सामन्यांत ५ विकेट घेतल्या आहेत. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळणार आहे.

फर्ग्युसनऐवजी जेमिसन

पंजाब किंग्ज संघामधील न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्याजागी न्यूझीलंडच्याच काइल जेमिसनला संघात स्थान देण्यात आले आहे. जेमिसन यापूर्वी २०२१ च्या आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळला होता. यावर्षी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत जेमिसन क्वेट्टा ग्लॅडिएडर्स संघातर्फे सहभागी झाला होता. पंजाबने त्याला २ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.

दरम्यान, गुजरात टायटन्सचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर काही दिवसांनी इंग्लंडकडून खेळण्यासाठी मायदेशी परतणार आहे. त्याच्याजागी गुजरातकडून श्रीलंकेच्या कुसल मेंडिसला ७५ लाख रुपयांना करारबद्ध करण्यात आले.

हेही वाचा :
‘प्ले-ऑफ’साठी चुरस वाढली
इडन गार्डन्सवर होईल अंतिम सामना

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00