पुणे : प्रतिनिधी : नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकने एका व्हॅनला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकची धडक बसल्यानंतर व्हॅन पुढे थांबलेल्या बसवर आदळली. त्यात शिक्षिकेसह नऊजणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.(road accident )
देबुबाई दामू टाकळकर, विनोद केरूभाऊ रोकडे, युवराज महादेव वाव्हळ, चंद्रकांत कारभारी गुंजाळ , गीता बाबुराव गवारे, भाऊ रभाजी बढे, नजमा अहमद हनीफ शेख, वशिफा वशिम इनामदार आणि मनीषा नानासाहेब पाचरणे अशी मृतांची नावे आहेत.(road accident )
चालक विनोद रोकडे मॅक्झिमो व्हॅन आळेफाटा येथून सोळा प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होता. पावणेदहाच्या सुमारास मुक्ताबाई ढाब्यासमोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने व्हॅनला मागून धडक दिली. त्यानंतर व्हॅन महामार्गाच्या कडेला बंद असलेल्या एसटी बसवर आदळली. या वाहनाला मागून व पुढून जोराची धडक बसल्याने वाहनाचा चक्काचूर झाल्याने अपघाताची तीव्रता वाढली.(road accident )
सेवेची दोन वर्ष बाकी
मनीषा पाचारणे या शिक्षिका आहेत. त्या आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. कांदळी येथून शाळेत जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. दोन वर्षांनंतर त्या निवृत्त होणार होत्या. युवराज वाव्हळ हा तरुण नारायणगाव येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो येथील अकादमीत अभ्यास करण्यासाठी निघाला होता. या अपघातात त्याचाही मृत्यू झाला.(road accident )
मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख
दरम्यान, या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत अपघातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी मदतीची घोषणा केली. तसेच त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे पुणे पोलीस अधीक्षकांना सांगितल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.(road accident )
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.
मृतांच्या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2025
हेही वाचा :
सैफ प्रकरणातील हल्लेखोर ताब्यात