विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर एकमत
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला एक जागा वाट्याला आल्याने या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे.
आज गुरुवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दोघांमध्ये विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. भेटीनंतर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, राज्यसभेची निवडणूक आम्ही लढवू शकलो नाही. पण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत. ते विधान परिषदेत जात असतील तर नक्कीच आनंद आहे असे म्हणत त्यांनी पाठिंबा दर्शविला. (Consensus Reached on Uddhav Thackeray’s Name for Legislative Council Election)
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सोशल मिडियावर टिव्ट करत उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा दर्शवली आहे. उद्धव ठाकरे यांनीच निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीची विनंती आहे. ते राज्यातील अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाचा होत राहील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा अशी विनंती केली आहे. (Consensus Reached on Uddhav Thackeray’s Name for Legislative Council Election)
विधान परिषदेत एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीतील भाजपकडे १३१, शिवसेनेकडे ५७ तर राष्ट्रवादीकडे ४० आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे आठ आमदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ ४६ असल्याने त्यांच्या वाट्याला एक जागा आली आहे. (Consensus Reached on Uddhav Thackeray’s Name for Legislative Council Election)