Home » Blog » ‘सायकलिंग’मधील ‘जीवन गौरव’ प्रताप जाधव यांना

‘सायकलिंग’मधील ‘जीवन गौरव’ प्रताप जाधव यांना

नवी दिल्लीत आयोजित समारंभात पुरस्कार वितरण

by प्रतिनिधी
0 comments
Pratap Jadhav

कोल्हापूर : भारतामधील सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘जीवन गौरव’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रताप जाधव यांना सन्मानीत करण्यात आले. नवी दिल्लीत आयोजित समारंभात एशियन सायकलिंग कॉन्फेडरेशन(एसीसी)चे महासचिव ओंकार सिंग आणि नवी दिल्लीचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगपती गुरमीत सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतामध्ये सायकलिंग खेळासाठी २५ वर्षांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने गौरविण्यात येते.

प्रताप जाधव यांनी १९७७ ते १९८७ दरम्यान खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवली. यात राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली. त्यांनी दोन वेळा राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले आहे. त्यांनी भारतातील सर्वांत जुन्या आणि खडतर समजल्या जाणाऱ्या मुंबई – पुणे सायकल स्पर्धेत सहा वेळी सहभाग घेतला आहे. रौप्यमहोत्सवी स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे.

१९९३ पासून राज्य तसेच राष्ट्रीय सायकलिंग संघटनेत विविध पदावर काम केले आहे. जाधव सध्या सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष आहेत. चार वर्षे ते सीएफआयचे खजिनदारही होते.  संघटक म्हणून आपल्या ४० वर्षांच्या काळात प्रताप जाधव यांनी २३ वेळा मुंबई-पुणे सायकल स्पर्धा, १५ वेळा एमटीबी, ४ वेळा रोड आणि एकदा  ट्रॅक अशा २० राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा, १० वेळा राष्ट्रीय शालेय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. चार दिवसीय स्टेज सायकल स्पर्धा सलग दोन वर्षे आयोजित केली. तसेच सर्वांत लांब पल्ल्याच्या २५० किमी अंतराच्या कोल्हापूर – सातारा – कोल्हापूर एकदिवसीय सायकल स्पर्धा आयोजनाचा विक्रम आजही जाधव यांच्या नावावर आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00