Home » Blog » मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमींवर मोफत उपचार

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमींवर मोफत उपचार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
Kurla Bus Accident

मुंबई; विशेष प्रतिनिधी : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात दगावलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येईल तसेच जखमींवर मुंबई महापालिका व बेस्टच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबत ‘एक्स’वर मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की, मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो. (Kurla Bus Accident)

मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी बेस्टचे मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) यांच्या अध्यक्षतेखाली चौकळी समिती नेमण्यात आली आहे. यासह अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमामार्फत दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Kurla Bus Accident)
कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसचा थरार पाहायला मिळाला. ही बस

कुर्ला पश्चिम येथून अंधेरीकडे निघाली होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. एका भिंतीवर आदळून बस थांबली. अपघातात सात जण ठार झाले तर ४९ जण जखमी झाले त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींवर औषधोपचारांचा खर्च बृहन्मुंबई महापालिका व बेस्ट उपक्रम यांच्या मार्फत केला जाणार आहे.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00