Home » Blog » Kshirsagar is confident of a Mahayuti victory : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकवणारच : राजेश क्षीरसागर..

Kshirsagar is confident of a Mahayuti victory : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकवणारच : राजेश क्षीरसागर..

by प्रतिनिधी
0 comments
Kshirsagar is confident of a Mahayuti victory

कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुती सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार  शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे  क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. (Kshirsagar is confident of a Mahayuti victory)

शिवसेनेच्या जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल विनायक साळोखे, शहर संघटक पदी निवड झाल्याबद्दल हर्षल सुर्वे, कसबा बावडा शहर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल कृष्णा लोंढे, कसबा बावडा शहर संघटक पदी निवड झाल्याबद्दल आदर्श जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार क्षीरसागर  म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर तसेच त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर विश्वास ठेवून जनतेने २३२ आमदार निवडून दिले, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे नेतृत्वावर विश्वास ठेवून कोल्हापुरातील अनेक माजी नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी  यापूर्वीही शिवसेनेत प्रवेश केला, तसेच नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक आणि विविध समित्यांचे माजी अध्यक्ष तसेच कोल्हापूर शहरातील मान्यवरानी पक्ष प्रवेश केला आहे. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी एकनाथ शिंदे  यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी मंजूर करून आणत विकास कामे सुरू आहेत.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवीन आलेल्या सर्वांना सोबत घेऊन तसेच कुठल्याही जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ न देता, ताकतीने निवडणूक लढवून जास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणून महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. (Kshirsagar is confident of a Mahayuti victory)

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख रणजीत जाधव, कमलाकर जगदाळे, रमेश खाडे, किशोर घाटगे,दीपक चव्हाण, सुनिल जाधव, अजय इंगवले, नेपोलीयन सोनुले, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, उद्योजक विवेक महाडिक, रणधीर महाडिक, माजी परिवहन समितीचे सभापती अजित मोरे, माजी नगरसेवक रमेश पोवार, सुभाष मोरे, राजू हुंबे, रत्नेश शिरोळकर, रमेश पुरेकर, माजी महिला आणि बालकल्याण समिती सभापती मृदुला पुरेकर, प्रविण लिमकर, प्रसाद उगवे, रमेश भोसले, माजी नगरसेविका स्मिता माळी, रामचंद्र भाले, रवींद्र साळोखे, अंकुश निपाणीकर,अर्जुन आंबी, सुरेश माने, दुर्गेश लिंग्रस,प्रभू गायकवाड, किरण पाटील, श्रीकांत मंडलिक, सौरभ कुलकर्णी आदी उपस्थित होते. (Kshirsagar is confident of a Mahayuti victory)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00