Home » Blog » SC’s relief for Thug Life: ‘‘ठग लाईफ’ कर्नाटकात प्रदर्शित झालाच पाहिजे’

SC’s relief for Thug Life: ‘‘ठग लाईफ’ कर्नाटकात प्रदर्शित झालाच पाहिजे’

by प्रतिनिधी
0 comments
SC’s relief for Thug Life

नवी दिल्ली : ‘ठग लाईफ’ कर्नाटकात प्रदर्शित झालाच पाहिजे. जाळपोळ आणि हिंसाचाराच्या धमक्यांना भीक न घालता चित्रपट प्रदर्शित करण्याचे चित्रपट निर्माते आणि थिएटर मालकांना अधिकार आहेत. कर्नाटक सरकारने राज्यात ‘ठग लाईफ’ प्रदर्शित करू द्यावा, सरकारने चित्रपट निर्माते आणि अभिनेते कमल हासनच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे असेही सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१७ जून) स्पष्ट केले. (SC’s relief for Thug Life)

कन्नड भाषेबद्दलच्या वक्तव्याबद्दल अभिनेता कमल हासन यांच्याकडे माफी मागण्याचा आग्रह कर्नाटक उच्च न्यायालयाने धरू नये, असा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिला. (SC’s relief for Thug Life)

सर्वोच्च न्यायालयाने हासन यांच्या ‘ठग लाईफ’ चित्रपटाशी संबंधित सर्व याचिकांसदर्भातील कार्यवाही स्वतःकडे हस्तांतरित केली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. प्रकरणाच्या निकडीमुळे मागील सुनावणीत कोर्टाने आधीच नोटीस बजावली होती, असे न्यायालयाने नमूद केले. (SC’s relief for Thug Life)

कायद्याचे राज्य टिकले पाहिजे आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने मंजूर केलेला कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे, असे मत न्यायाधीश उज्जल भुयान आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. ‘‘रस्त्यावर गर्दी करून किंवा सुरक्षारक्षक उतरवून या मुद्द्यावर गोंधळ घालण्याची परवानगी दिली जाणार नाही,’’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.

कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित असलेला हा खटला आता भविष्यातील सर्व सुनावणींसाठी सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात, कर्नाटक उच्च न्यायालयाने हासन यांनी कन्नड भाषेच्या उत्पत्तीबद्दल केलेल्या टिप्पण्यांसाठी माफी मागण्यास नकार दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. तसेच ‘‘अद्याप माफी का मागितली जात नाही?’’ अशी विचारणाही केली होती. (SC’s relief for Thug Life)

उच्च न्यायालयाने दिवंगत राजकारणी सी. राजगोपालाचारी यांचाही संदर्भ दिला होता, ज्यांनी एकदा कन्नडीगांची जाहीरपणे माफी मागितली होती.

मंगळवारच्या आदेशासह, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणासंदर्भातील सुनावणी आपल्याकडे घेतली. यामुळे चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांना सध्या प्रादेशिक न्यायालयांच्या हस्तक्षेपापासून प्रभावीपणे संरक्षण मिळाले आहे.

कमल हासन यांचे वक्तव्य काय होते?

‘ठग लाईफ’च्या प्रमोशनदरम्यान कमल हासन यांनी ‘‘कन्नडचा जन्म तामिळ भाषेतून झाला आहे,’’असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला होता. राजकीय नेते आणि चित्रपट संघटनांनी कमल हासन यांच्यावर टीकाही केली. कर्नाटक भाजपचे प्रमुख बी. वाय. विजयेंद्र यांनी हासन यांना माफी मागण्याचे आवाहन केले होते. (SC’s relief for Thug Life) हासन यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्यानंतर स्वत: भूमिका स्पष्ट केली होती.  राजकारणी ‘‘भाषेबद्दल बोलण्यास पात्र नाहीत.’’ ‘‘मला वाटते की मी जे बोललो ते कन्नडच्या प्रेमापोटी. अनेक इतिहाससंशोधकांच्या अभ्यासाच्या आधारे बोललो. ज्यांनी मला भाषा, इतिहास शिकवला त्यांच्या आधारे मी बोललो. यात मला दुसरे काहीही म्हणायचे नव्हते. राजकारणी भाषेबद्दल बोलण्यास पात्र नाहीत. त्यांचे त्यासंबंधीचे पुरेसे शिक्षण असत नाही. त्यात मीही आहे. म्हणून या सर्व सखोल चर्चा इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भाषा तज्ञांवर सोडूया. आपण एक कुटुंब आहोत आणि एक भाषा देखील आहेत,’’ असे कमल हासन यांनी म्हटल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

हेही वाचा :
महिला अधिकाऱ्याला सेवेतून मुक्त करू नये : सर्वोच्च न्यायालय

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00