Home » Blog » Kamal Haasan: कन्नडवरील प्रेमातूनच बोललो, माफी नाही : कमल हासन

Kamal Haasan: कन्नडवरील प्रेमातूनच बोललो, माफी नाही : कमल हासन

by प्रतिनिधी
0 comments
Kamal Haasan

तिरुवंतपुरम : कन्नडविषयी मी केलेले विधान कन्नड भाषेवरील प्रेमातूनच केले आहे. त्यामुळे ‘‘प्रेम कधीही माफी मागत नाही,’’ असे अभिनेता-राजकारणी कमल हासन यांनी बुधवारी (२८ मे) स्पष्ट केले. (Kamal Haasan)

तुम्ही उत्तरेकडील दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या मते ते बरोबर आहे, जर तुम्ही ते थेंकुमारी (दक्षिण) वरून पाहिले तर मी जे म्हणतो ते बरोबर आहे, असेही ते म्हणाले.

‘‘तमिळने कन्नडला जन्म दिला,’’ असे विधान कमल हासन यांनी नुकतेच केले. त्यांच्या या विधानावर कर्नाटकातील कन्नड समर्थक संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या ‘ठग लाईफ’ या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर हासन यांनी हे उत्तर दिले. (Kamal Haasan)

‘‘माझ्या विधानांवरून ज्यांनी वाद निर्माण केला ते माझा मुद्द्याबद्दल गोंधळ निर्माण करीत आहेत. मला वाटतं मी जे बोललो ते खूप प्रेमाने बोललो. इतिहासकारांनी मला भाषेचा इतिहास शिकवला आहे. याव्यतिरिक्त मला वेगळे काही म्हणायचे नव्हते,’’ असे ते म्हणाले.

ते म्हणाले की तामिळनाडू हे एक असे दुर्मिळ राज्य आहे जे सर्वांसाठी खुले आहे.

‘‘मी तुम्हाला सांगतो की, तामिळनाडू हे एक खुले राज्य आहे. मी असे म्हणत नाही की असे दुसरे कोणतेही राज्य नाही. पण एक अतिशय दुर्मिळ राज्य जिथे मेनन (एमजी रामचंद्रन) आपले मुख्यमंत्री राहिले आहेत. एक रेड्डी (ओमंडूर रामास्वामी रेड्डियार) आपले मुख्यमंत्री आहेत, एक तमिळ (एम. करुणानिधी) आपले मुख्यमंत्री आहेत आणि नंतर मंड्या येथून कन्नडिगा अय्यंगार आपले मुख्यमंत्री आहेत,’’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Kamal Haasan)

दिवंगत जयललिता यांना उद्देशून त्यांनी कन्नडिगा अय्यंगार उल्लेख होता. ‘‘जेव्हा (मूळच्या) कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांकडून  (जयललिता) काही समस्या निर्माण झाली तेव्हा कर्नाटकनेच मला पाठिंबा दिला. त्यावेळी इथे या असे कन्नडिगा म्हणाले, आम्ही तुम्हाला घर देऊ, कुठेही जाऊ नका. त्यामुळे लोक ठग लाईफची काळजी घेतील, कमल हासनची काळजी घेतील,’’ असे ते म्हणाले.
राजकारण्यांना भाषेतील काही समजत नाही. त्यामुळे हा मुद्दा इतिहास संशोधक, भाषा तज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांवर सोडून देऊ, असे ते म्हणाले.


हेही वाचा :
खोट्या एन्काउंटरची चौकशी करा : सर्वोच्च न्यायालय
होय, मी पाकिस्तानला गेलो होतो : गोगोई

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00