कोल्हापूर : राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ लक्षवेधी ठरली.
सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील ५० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी मेडिकेयर फील्ड मधील ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ हा प्रोजेक्ट सादर केला. या संघाला द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. (D.Y. College Secures Second Place in National Hackathon Competition)
विजयी संघात संगणक अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या देसाई, सारथी पाटील, आर्य सुतार, सुमित मुळे व स्वरूप पाल या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या संघाला २० हजार रुपयांचे रोख पारितोषिकही प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के . गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. राधिका ढणाल यांनी संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (D.Y. College Secures Second Place in National Hackathon Competition)