लंडन : नाईट वॉचमन आकाशदीपची (६६) धडाकेबाज खेळी आणि सलामीवर यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीने भारताने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या पाचव्या कसोटीत दुसऱ्या डावात चहापानापर्यंत ६ बाद ३०४ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने २८१ धावांचे लिड घेत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. क्रीजवर रवींद्र जडेजा २६ तर ध्रुव जुरेल २५ धावांवर खेळत आहेत. (Jaiswal’s century)
कालच्या २ बाद ७५ धावांवरुन भारताने डाव सुरू केला. पहिल्या तासात भारताचे दोन ते तीन गडी बाद करण्याचा इंग्लंडचा डाव यशस्वी जयस्वाल आणि आकाशदीपने उधळून लावला. दोघांनी इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. १५० चेंडूत १०७ धावांची भागीदारी केली. जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर गस अटकिन्सनने त्याचा झेल घेतला. ६६ धावांच्या खेळीत त्याने १२ चौकार मारले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताने ३ बाद १८९ धावा जमवल्या. (Jaiswal’s century)
उपाहारानंतर खेळ सुरू झाल्यानंतर गस अटकिन्सनच्या इनस्विंगरवर शुभमन गिल चकला आणि चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि इंग्लिश खेळाडूंची पायचितचे अपिल पंचांनी उचलून धरले. गिलने ११ धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात अर्धशतकवीर करुन नायर मैदानात उतरला. इंग्लिश गोलंदाजांनी त्याच्यावर शरीरभेदी बाउन्सरचा मारा केला. एक उसळता चेंडू लागला करुन नायरच्या ग्लोजव्हर आदळल्या तो कळवळला. त्यानंतर गस अटकिन्सच्या गोलंदाजीवर उसळता चेंडू करुन नायरच्या ग्लोजला लागून विकटकिपर जेमी स्मिथने त्याचा झेल टिपला. यावेळी भारताची धावसंख्या २२९ इतकी होती. (Jaiswal’s century)
शतकवीर जयस्वाल आणि रवींद्र जडेजा या डावखुऱ्या जोडीने इंग्लंडची गोलंदाजी खेळून काढण्यास सुरुवात केली. जयस्वाल अखूड टप्प्यांच्या चेंडूना टोलवत होता. जोश टंगचा एक चेंडू टोलवताना थर्डमॅनला जेमी ओव्हरटने त्याचा झेल टिपल्यावर जयस्वालची शतकी खेळी संपुष्टात आली. त्याने १४ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने १४२ चेंडूत ११८ धावा केल्या. जयस्वाल बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ६ बाद २७३ अशी होती. त्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात आला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताने ६ बाद ३०४ धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजा २६ तर ध्रुव जुरेल २५ धावांवर खेळत होते. (Jaiswal’s century)