Home » Blog » ‘खंडोबा’ने उडवला ‘जुना बुधवार’चा धुव्वा

‘खंडोबा’ने उडवला ‘जुना बुधवार’चा धुव्वा

by प्रतिनिधी
0 comments
Khandoba Talim defeats Juna Budhwar Sangh

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Khandoba Talim defeats Juna Budhwar Sangh)

खंडोबा तालीम मंडळाने आजच्या सामन्यात पूर्णवेळेतील खेळावर वर्चस्व ठेवत जुना बुधवार संघाची डाळ शिजू दिली नाही. पूर्वार्धात २५ व्या मिनिटाला प्रथमेश गावडेच्या पासवर विष्णू मणिकंडमने गोल करत संघाचे खाते खोलले. त्यानंतर २९ व्या मिनिटाला कुणाल दळवीच्या पासवर प्रतापने गोल करत संघाची आघाडी वाढवली. मध्यंत्तरास खंडोबा तालीम मंडळ २-० असा आघीवर होता. (Khandoba Talim defeats Juna Budhwar Sangh)

उत्तरार्धातील खेळावरची खंडोबाची छाप होती. ४४ मिनिटाला विष्णू मणिकंडमच्या पासवर रोहित जाधवने गोल केला. त्यानंतर ५५ व्या मिनिटाला संजय एस.च्या पासवर पृथ्वीराज साळोखेने चौथा गोल केला. ६३ व्या मिनिटाला विष्णू मणिकंडमने जुना बुधवारची बचावफळी भेदत वैयक्तिक दुसरा आणि संघाचा पाचवा गोल नोंदवला. पाच गोलची घसघशीत आघाडी कायम टिकावत खंडोबाने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. विष्णू मणिकंडमची सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. (Khandoba Talim defeats Juna Budhwar Sangh)

शनिवारी दिलबहार तालीम मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात दुपारी चार वाजता सामना होणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00