Home » Blog » Jaishankar clarifies on Trump: भारत-पाकिस्तान युद्धबंदीत ट्रम्प यांचा सहभाग नाही : परराष्ट्रमंत्री

Jaishankar clarifies on Trump: भारत-पाकिस्तान युद्धबंदीत ट्रम्प यांचा सहभाग नाही : परराष्ट्रमंत्री

by प्रतिनिधी
0 comments
Jaishankar clarifies on Trump

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धबंदीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कसलाही सहभाग नव्हता, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (२८ जुलै) लोकसभेत स्पष्ट केले. (Jaishankar clarifies on Trump)

ते म्हणाले, ९ मे २०२५ रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून पुढील काही तासांत पाकिस्तानकडून मोठा हल्ला होणार असल्याचा इशारा दिला. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी, जर असा हल्ला झाला तर त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असे उत्तर दिले. त्यानंतर आमच्या सशस्त्र दलांनी तो हल्ला उधळून लावला.

‘‘१० मे २०२५ रोजी आम्हाला असे काही फोन कॉल आले. ज्यात इतर देशांचा असा समज होता की पाकिस्तान लढाई थांबवण्यास तयार आहे. आमची भूमिका अशी होती की, जर पाकिस्तान तयार असेल तर आम्हाला पाकिस्तानकडून डीजीएमओ चॅनेलद्वारे विनंती म्हणून तसे कळवावे लागेल. त्यांच्याकडून तशी विनंतीही आली,’’ असा घटनाक्रम त्यांनी सांगितला.(Jaishankar clarifies on Trump)

मी दोन गोष्टी अगदी स्पष्ट करू इच्छितो, असे सांगून जयशंकर यांनी, अमेरिकेशी झालेल्या कोणत्याही चर्चेत, जे काही चालले आहे त्याचा व्यापाराशी कोणताही संबंध नव्हता. दुसरे म्हणजे, २२ एप्रिल रोजी (पहलगाम हल्ल्यानंतर) सहानुभूती व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आणि त्यानंतर कॅनडा दौऱ्यावर असताना, १७ जून २०२५ रोजी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. त्यानंतर उभय नेत्यांदरम्यान फोनवर संभाषण झालेले नाही.’’(Jaishankar clarifies on Trump)

जयशंकर बोलत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या दाव्यांचे खंडन केले. त्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी, जयशंकर यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्यावे, अशी विनंती अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली.

तसेच तुम्ही देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांपेक्षा परदेशी नेत्यावर जास्त विश्वास का ठेवतात, असा सवाल शहा यांनी विरोधकांना उद्देशून केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ मागची भूमिका अन्य देशांना सांगण्यासाठी गेलेल्या संसदीय शिष्टमंडळांचे मोठ्या सन्मानाने स्वागत करण्यात आले, याकडेही यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा :
तुमच्याकडे पेगासस आहे मग पहलगामचे दहशतवादी का सापडत नाहीत? : गोगोईंचा हल्लाबोल
पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार ठार?; तीन दहशतवाद्यांचा खात्मा
‘ऑपरेशन सिंदूर’वर अर्थपूर्ण प्रश्न विचारण्यात विरोधक अपयशी : राजनाथ

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00