नवी दिल्ली : जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय दिव्या देशमुखने विजेतेपदावर नाव कोरले. तिने भारतातील प्रथम मानांकित कोनेरु हम्पीला जलद टायब्रेकरमध्ये हरवले. या विजयाने तिला ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवून दिला. नागपूरची दिव्या देशमुख भारतीय आणि जागतिक बुद्धिबळ पटलावर तेजस्वी तारा म्हणून पुढे आली आहे. (Divya Deshmukh)
या स्पर्धेत १५ व्या मानांकित खेळाडू म्हणून प्रवेश करताना दिव्याने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने तिने जगातील बलाढ्य खेळांडूवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतातील नामांकित खेळाडू कोनोरु हम्पी हिच्याबरोबर लढत झाली. अंतिम फेरीतही तिने दबावाखाली न खेळता विजय संपादन केला. दोन क्लासिकल गेममध्ये ड्रॉ झाल्यानंतर सामना रॅपिड टायब्रेकरमध्ये गेला.
रॅपिड टायब्रेकमध्ये पहिल्या रॅपिडमध्ये दिव्याने व्हाईटविरुद्ध खेळ केला. तो समतोल बरोबरीत सुटला. पण दुसऱ्या गेममध्ये दिव्याने ब्लॅक पीस मध्ये खेळताना उल्लेखनीय संयम दाखवला. अखेर ३८ वर्षीय हम्पीने शेवटच्या गेममध्ये दबावाखाली खेळताना अनेक गंभीर चुका केल्या. दिव्याने त्याचा फायदा उठवत या आघाडीचे आश्चर्यकारक विजयात रुपांतर करत विजेतेपद पटककावले. या विजयामुळे दिव्या देशमुख फिडे महिला विश्वचषक स्पर्धेची विजेती ठरली व शेवटी तीने ग्रँडमास्टर नॉर्म देखील मिळवला. या विजयामुळे तिला अधिकृतपण प्रतिष्ठित ग्रँडमास्टरचा किताब पटकावला. हा टप्पा गाठणारी चौथी भारतीय महिला असून ८८ वी भारतीय खेळाडू ठरली आहे. (Divya Deshmukh)
दिव्याचा प्रवास प्रेरणादायी असून ती टॉप फेव्हरिटमध्ये नसतानाही स्पर्धेत प्रवेश केला. आक्रमक खेळ आणि सखोल तयारीमुळे तिने स्पर्धेतील सातत्य कायम दाखवल्याने प्रतिष्ठित खेळाडूंना पराभूत केले. भारतीय बुद्धिबळ प्रतिभेच्या नवीन पिढीचे भवितव्य दिसूत येत आहे. भारताचा पाच वेळा विश्वविजेता पटकावलेल्या विश्वनाथ आनंदनेही दिव्या देशमुखचे अभिनंदन केले.
तिच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
“भारतीय बुद्धिबळाचा एक महान उत्सव..”
-विश्वनाथ आनंद