Home » Blog » Kavind visited Ambabai Temple : माजी राष्ट्रपती कोविंद यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

Kavind visited Ambabai Temple : माजी राष्ट्रपती कोविंद यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

by प्रतिनिधी
0 comments
Kavind visited Ambabai Temple

कोल्हापूर : प्रतिनिधी :  माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची  मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. (Kavind visited Ambabai Temple)

       यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी पद्मश्री डॉ.विकास महात्मे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी राष्ट्रपतींचे खाजगी सचिव अमरीकसिंग, अतिरिक्त सचिव जसवीर चोपडा, डॉ. मनोज कुमार, पन्हाळा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते. (Kavind visited Ambabai Temple)

अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.  जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्वागत केले. यावेळी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, विश्वस्त विनायक भोसले,  विमानतळ संचालक अनिल शिंदे, राधानगरी प्रांताधिकारी  प्रसाद चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी येडगे यांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा पर्यटन पुस्तिका भेट दिली. (Kavind visited Ambabai Temple)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00