Home » Blog » soldier martyred: पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद

soldier martyred: पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद

आंध्र प्रदेशातील मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

0 comments
soldier martyred

नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी (८ मे) रात्री नियंत्रण रेषेवर (एलओसी) केलेल्या गोळीबारात घाटकोपरमधील जवान मुरली नाईक (२३) यांना वीरमरण आले. नाईक यांचे मूळ गाव आंध्र प्रदेशच्या श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्ली थंडा हे आहे. (soldier martyred)

गोरंटला येथील स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरली नाईक हा आदिवासी वस्तीतील एका गरीब शेतकरी कुटुंबातील होते. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन करून तोफगोळ्यांचा जोरदार हल्ला केला. त्यावेळी नाईक जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर तैनात होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी नवी दिल्लीला विमानाने नेण्यात आले. मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले. मुरली नाईक एकुलते आणि अविवाहीत होते. (soldier martyred)

सकाळी नाईक यांच्या निधनाची बातमी संपूर्ण जिल्ह्यात पसरताच कल्ली थंडा आणि आसपासच्या गावांमधील गरीब आदिवासी समुदायावर शोककळा पसरली. मुरली हे मुदवथ श्रीराम नाईक आणि मुदवथ ज्योती बाई यांचे एकुलते होते. त्यांचे आईवडील दोघेही शेतमजूर म्हणून काम करतात. शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील स्थानिकांनी कल्ली थंडा येथे धाव घेतली.

‘‘आम्ही मुरली नाईक यांच्या शौर्याला आणि समर्पणाला सलाम करतो. त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही,’’ असे मृतांच्या गावाला भेट दिलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अंतिम संस्कारांसाठी मुरली नाईक यांचे पार्थिव शनिवारी (१० मे) सकाळी गावात पोहोचेल, असे सांगण्यात आले.

हेही वाचा :
बीएसएफकडून सात दहशतवादी यमसदनी
द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00