Home » Blog » होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय टँकरवर गोळीबार

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय टँकरवर गोळीबार

by प्रतिनिधी
0 comments
Indian Tanker Fired Upon in the Strait of Hormuz

नवी दिल्ली : होर्मुझची सामुद्रधुणी खुली झाल्याचे घोषणा केली असताना इराणने शनिवारी इराणने अचानक यू टर्न घेतला. इराणच्या गनबोटस् कडून जहाजांवर गोळीबार करण्यात आला आहे. त्यामध्ये एका भारतीय सुपरटँकरचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. भारताने इराणनच्या राजदुताकडे या  हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. गोळीबाराच्या घटनेने होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला आहे. (Indian Tanker Fired Upon in the Strait of Hormuz)

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वीस लाख बॅरेल इराकी तेल घेऊन जाणाऱ्या भारतीय टँकरला गोळीबारानंतर माघारी परतावे लागले. युके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स नुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या दोन गनबोट्सनी सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका टँकरवर गोळीबार केला. जहाजावरील कर्मचारी आणि जहाज सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले, मात्र अधिकाऱ्यांनी जहाजाची ओळख उघड केलेले नाही. टँकरट्रॅकर्स.कॉमने असेही म्हटले आहे की, या घटनेनंतर भारतीय ध्वज असलेल्या एका सुपरटँकरसह अनेक जहाजांनी आपला मार्ग बदलला. (Indian Tanker Fired Upon in the Strait of Hormuz)

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका-इराण चर्चेतून अद्याप स्पष्ट परिणाम निष्पन्न न झाल्याने, परिस्थितीबद्दलच्या गोंधळामुळे भारतीय कच्च्या तेलाचे टँकर परत फिरले. तेहरानकडून स्पष्टतेचा अभाव असल्याने जहाजमालक हा मार्ग वापरण्याबाबत सावध झाले आहेत. भारतीय जहाजांसोबतच, अनेक ग्रीक टँकर्सनीसुद्धा दिवसाच्या सुरुवातीला माघारी फेरफटका मारला, जे जगातील सर्वात व्यस्त तेल मार्गांपैकी एकातील सुरक्षेबाबत वाढती चिंता दर्शवते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शनिवारी अशांत जलमार्गातून जाण्याचा प्रयत्न करत असताना किमान दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार झाला. (Indian Tanker Fired Upon in the Strait of Hormuz)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00