महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरूद्धच्या तीन सामन्याच्या वन-डे मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवला. मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने विंडिजविरूद्ध पाच गडी राखून विजय मिळवला. आज (दि.२७) वडोदरा येथे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने ३८.५ षटकात १० गडी गमावून १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने २८.२ षटकांत ५ विकेट गमावत १६७ धावा करत सामना जिंकला. (IND W vs WI W)
सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीत विंडिजच्या शिनेल हेन्री (६१) आणि शमाइन कॅम्पबेल (४६) यांनी ९७ धावांची भागीदारी केली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. या व्यतिरिक्त आलिया एलेनी (२१) दुहेरी अंक गाठू शकली.
भारताची गोलंदाज ठाकूरने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर कियानला बाद केले तर, हेली मॅथ्यूजही खाते न उघडता तिचा दुसरा बळी ठरली. यानंतर ठाकूरने डिआंड्रा डॉटिनची विकेट घेत कॅरेबियन संघाला मोठा धक्का दिला. (IND W vs WI W)
विंडिजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने २९व्या षटकात विजयाची नोंद केली. ४ बाद ७३ धावांवर अशी धावसंख्या असताना दीप्तीने दमदार फलंदाजी करत भारताला विजयी केले. तिने आपल्या खेळीत ४८ चेंडूंत नाबाद ३९ धावांची मोलाची खेळी केली. तर, रिचा घोष ११ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिली. हरलीन देओल (१) स्वस्तात बाद झाली. यानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौरने २२ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान हरमनप्रीतने सात चौकार मारले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ती बाद झाली.
फॉर्ममध्ये असलेली उपकर्णधार स्मृती मानधना (४) लवकर बाद झाली, तिला अश्मिनी मुनिसारने आलिया ॲलेनेच्या गोलंदाजीवर एका हाताने झेलबाद केले. मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जने ४५ चेंडूत २९ धावांची खेळी खेळली.
हेही वाचा :
- पुन्हा चढला विराटचा पारा
- मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
- कॉन्स्टसचा विक्रम; बुमराहचे महागडे षटक