Home » Blog » सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक : राजू शेट्टी

सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक : राजू शेट्टी

by प्रतिनिधी
0 comments
Inauguration of Satej Agricultural Exhibition

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.  राजू शेट्टी यांच्या हस्ते सतेज कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यावेळी ते बोलत होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  आणि इंडिया बुक रेकॉर्ड करणारी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावची तीन फुटाची राधा म्हैस प्रदर्शनाची मुख्य आकर्षण राहणार आहे.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,  जागतिक तापमान वाढशेतीमध्ये बदल होत चाललेले आहेत काळानुरूप शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेतीमध्ये बदल करावेत याचे उपयुक्त ज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. (Inauguration of Satej Agricultural Exhibition)     

माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले,  शेतकरी हा देशाचा कणा असून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, बाजारपेठेची माहिती मिळावी या उद्देशाने सात वर्षांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी  कृषी प्रदर्शनाचा निर्णय घेतला आणि आज मोठ्या प्रमाणात व्याप्ती वाढली आहे या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दहा कोटींच्या आसपास उलाढाल होते. शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती देण्याचा प्रयत्न  कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केला जात आहे.

 यावेळी  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क उपप्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,  माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे,  मधुकर रामाने, ईश्वर परमार, गोकुळ संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, बाजार समिती बाजार समिती माजी सचिव मोहन सालपे,कळंबा सरपंच सुमन गुरव, जिल्हा परिषद माजी सदस्य शशिकांत खोत, किसन कल्याणकर, पल्लवी बोळाईकर, बाबासाहेब सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते. (Inauguration of Satej Agricultural Exhibition)

राधा म्हैस कृषी प्रदर्शनाचे आकर्षण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  आणि इंडिया बुक रेकॉर्ड करणारी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावची तीन फुटाची राधा म्हैस सतेज कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. अनिकेत त्रिंबक  बोराटे यांची ही म्हैस असून १९ जून २०२२ रोजी तिचा जन्म झाला आहे. आणि एक वर्षानंतर ती बुटकी असल्याचे लक्षात आले. जगात ही एकमेव गाय असल्याचे बोराटे यांनी सांगितले. तीन वर्षे वयाची दोन फूट आठ इंच ३१४ किलो वजन तेरा कृषी प्रदर्शनात सहभाग आणि सर्वत्र एक नंबरचे आकर्षण ही म्हैस ठरली आहे. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी  पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. (Inauguration of Satej Agricultural Exhibition)    

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00