Home » Blog » IC814 वेब सीरिजवरून नेमका वाद काय?

IC814 वेब सीरिजवरून नेमका वाद काय?

सध्या IC 814 ही नेटफ्लिक्सवरची सीरिज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. काहीनी #boycottic814 असा ट्रेंडही चालवायला सुरुवात केली आहे.

by प्रतिनिधी
0 comments

मुंबई

सिनेमा आणि वेबसीरिजवरून वादंग उठणं हे काही नवीन नाही. वास्तव आणि पडद्यावर किंवा स्क्रीनवर दाखवण्यात येणारं चित्र यात अनेकदा तफावत असते. काही वेळा लिबर्टिच्या नावाखाली मूळ इतिहासालाच धक्का पोहचवला जातो. पृथ्वीराज चौहान, तान्हाजी यांसारखे सिनेमा गेल्या काही वर्षांत वादाचा विषय ठरले आहेत. सध्या IC 814 The Kandahar Hijack ही नेटफ्लिक्सवरची सीरिज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. काहींनी #boycottic814 असा ट्रेंडही चालवायला सुरुवात केली आहे. पण, या वेबसीरिजवरून वाद होण्याचं नेमकं कारण काय?  हे जाणून घेण्याची गरज आहे.

Image

वेबसीरिजचा विषय काय?
२४ डिसेंबर १९९९ रोजी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या एका विमानाचे अपहरण केले होते. नेपाळची राजधानी काठमांडू येथून या विमानाचे अपहरण केले होते. अफगाणिस्तानची राजधानी कंदहार येथे हे विमान उतरविण्यात आले होते. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तात्कालीन एनडीए सरकारने दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करून ओलीत प्रवाशांच्या सुटका केली होती. त्यावेळी भारताच्या कैदेत असलेल्या मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यासह आणखी काही दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली होती. या घटनेवर आधारीत IC814 वेब सीरिज सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

Image

आधार काय?
IC814 या फ्लाईटचे पायलट देवी शरण यांनी पत्रकार श्रीजॉय चौधरी यांच्या मदतीन एक पुस्तक लिहिले होते. त्यांच्या “Flight Into Fear: The Captain’s Story” या गाजलेल्या पुस्तकाचा आधार घेत अनुभव सिन्हा यांनी ही वेबसीरिज पडद्यावर उतरली आहे. सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, विजय वर्मा यांसारख्या दिग्गज कलाकारंनी सीरिजमध्ये काम केले आहे.

वाद काय?
वेबसीरिजमध्ये विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे चीफ, बर्गर, डॉक्टर, शंकर, भोला अशी दाखवण्यात आली आहेत. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांनी तात्कालीन सरकारने परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळल्याचे दाखवले आहे, त्याविषयी आक्षेप घेतला आहे. सरकार अतिशय कमकुवत होते, असे दाखवल्यावरून अनेकांना आक्षेप आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00