Home » Blog » Cannes festival : ‘कान’ मध्ये चार मराठी चित्रपट

Cannes festival : ‘कान’ मध्ये चार मराठी चित्रपट

’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’, ‘जुनं फर्निचर' चित्रपटाची निवड

by प्रतिनिधी
0 comments
Cannes festival

जमीर काझी : मुंबई : फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड झाली आहे. (Cannes festival)

फ्रान्समध्ये १४ ते २२ मे  या कालावधीत  कान आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  होत आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने या चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. राज्याचे सांस्क‌तिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार यांनी रविवारी पत्रकार  परिषदेत  त्याची  घोषणा केली. (Cannes festival)

 महामंडळामार्फत २०१६ पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि जागतिक सिनेप्रेमींना मराठी चित्रपटाची भूरळ पडावी, हा यामागचा हेतू आहे. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता. (Cannes festival)

महोत्सवात निवड झालेले चित्रपट

स्थळ:

भारतातील ग्रामीण भागातील पारंपारिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘स्थळ’ हा चित्रपट आहे. समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत, रंगभेद आणि सामाजिक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. सचिन पिळगांवकर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. अभिनेत्री नंदिनी चिकटे या चित्रपटात मुख्य भूमिकेत तर दिग्दर्शन जयंत सोमलकर  यांनी केले आहे. (Cannes festival)

स्नो फ्लॉवर :

‘स्नो फ्लॉवर’ या  चित्रपटात मार्मिक, क्रॉसकंट्री कथा सांगणारा आहे. रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे. सैबेरिया आणि हिरवेगार कोकण यांच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. गजेंद्र अहिरे  दिग्दर्शक असुन विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले आणि सरफराज आलम सफू हे  महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Cannes festival)

खालिद का शिवाजी:

राज मोरे यांच्या ‘ या चित्रपटात खालिद हा  मुस्लिम धर्मीय असल्याने त्याला इतर मुले एकटे पाडतात. त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात, हे या चित्रपटात दाखवले आहे. (Cannes festival)

जुनं फर्निचर:

महेश मांजरेकर अभिनित व दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा आहे.  वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशाप्रकारे नाकारतात आणि त्यामुळे होणारे हाल दाखवण्यात आले आहेत.  भूषण प्रधान हा मुख्य भूमिकेत आहे. मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे याचाही समावेश आहे. (Cannes festival)

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंनी अटी, शर्ती टाकलेल्या नाहीत

पोलिसांने सहकाऱ्यांवर झाडल्या ११ गोळ्या

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00