Home » Blog » HC slams Rahul : ‘…लष्कराला बदनाम करण्याचा अधिकार नाही’

HC slams Rahul : ‘…लष्कराला बदनाम करण्याचा अधिकार नाही’

by प्रतिनिधी
0 comments
HC slams Rahul

अलाहाबाद : अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे, पण त्याअंतर्गत लष्कराला बदनाम करण्याचा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावले. (HC slams Rahul)

तसेच भारतीय लष्कराबाबतच्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून त्यांना मानहानी प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिला.

न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या एकल पीठाने गांधी यांची याचिका फेटाळून लावली.(HC slams Rahul)

“संविधानाच्या कलम १९ (१) (अ) अंतर्गत वाजवी निर्बंधांसह अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे. मात्र, निःसंशयपणे याअंतर्गत कोणालाही भारतीय लष्कराची बदनामी करण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या मानहानीच्या खटल्यात लखनौ एमपी-एमएलए कोर्टाने राहुल गांधींविरोधात समन्स जारी केले होते. त्याविरोधात गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यावर बुधवारी (४ जून) सुनावणी झाली.

आक्षेप नेमका काय?

राहुल गांधी यांच्या विरोधात बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी लखनौ कोर्टात  मानहानीचा खटला दाखल केला आहे. तो प्रलंबित आहे. राहुल गांधी यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय लष्कराविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, असे त्यात म्हटले आहे. ९ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षाबाबत राहुल गांधी यांनी अवमानजनक वक्तव्य केल्याचे श्रीवास्तव यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. राहुल यांनी भारतीय लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. (HC slams Rahul)

हेही वाचा :
युट्यूबर जसबीर सिंगला अटक
मंत्री महाजनांच्या कार्यालयात ३०० फायली पडून

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00