Home » Blog » Grandmother thrown by grandson : नातवाने आजीला कचऱ्यात टाकले

Grandmother thrown by grandson : नातवाने आजीला कचऱ्यात टाकले

by प्रतिनिधी
0 comments
Grandmother thrown by grandson

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील आरे परिसरात कचऱ्यामध्ये आजीला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संबधित महिलेचे नाव यशोदा गायकवाड असून तिला त्वचेचा कॅन्सर असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी संबधित महिलेला हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आरे परिसरात एका वृद्ध् महिलेला एक व्यक्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबधित महिलेला ताब्यात घेऊन उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये  नेले.  दोन हॉस्पिटलनी संबधित महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्यानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. संबधित महिलेचे नाव यशोदा गायकवाड आहे. आजीला त्वचेचा कॅन्सर असल्याने आणि उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने नातवाने आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून गेल्याची माहिती पुढे आली आहे. (Grandmother thrown by grandson)

पोलिसांनी वृद्ध महिलेकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना तिने मालाडमधील घराचा पत्ता दिला. पोलिसांनी त्या पत्त्यावर शोध घेतला असता घराला कुलुप असल्याचे दिसून आले. पोलिस संबधित महिलेच्या नातवाईक आणि नातवाचा शोध घेत आहेत. या घटनेने संतापाची लाट उसळली असून दोषींवर कारवाईची मागणी पुढे येत आहे. (Grandmother thrown by grandson)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00