Home » Blog » कुत्र्याच्या चाव्यामुळे ठाण्यातील बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या 

कुत्र्याच्या चाव्यामुळे ठाण्यातील बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या 

by प्रतिनिधी
0 comments
Bank employee in Thane commits suicide due to dog bite

मुंबई : ठाण्यातील एका ३०  वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानाने पायाला चावा घेतल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आयश अमीन असे त्याचे नाव असून त्याने गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका परिसरात घडली आहे.  (Bank employee in Thane commits suicide due to dog bite)

श्वान चावल्यानंतर रेबिजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीने त्याने गळफास घेतल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. आयश हे कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी, बी विंगमधील फ्लॅट क्रमांक ९०३ मध्ये परिवारासह राहत होते. आयश हे गेली आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँक, ठाणे शाखेत नोकरीला होते. त्यातच काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात भटक्या कुत्र्याने आयश यांच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतले होते. मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत होता, असे नातेवाईकांनी सांगितलं आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसताना अमीन यांनी आत्महत्या केली. (Bank employee in Thane commits suicide due to dog bite)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00