Home » Blog » Daniyawan-Hilsa road : ऑटो रिक्षा, ट्रक अपघातात दहा ठार

Daniyawan-Hilsa road : ऑटो रिक्षा, ट्रक अपघातात दहा ठार

by प्रतिनिधी
0 comments
Daniyawan-Hilsa road

पाटणा : प्रतिनिधी : ट्रक आणि ऑटो रिक्षाची ट्रकर होऊन झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला.  अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.  पाटणा जिल्ह्यातील दानियावान ब्लॉक अंतर्गत दानियावान-हिलसा रस्त्यावर शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या  सुमारास अपघात झाला. (Daniyawan-Hilsa road)

अपघातात घटनास्थळी सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. १० मृतांपैकी नऊ महिला असून आणि रिक्षा चालक आहे.  पाटण्याचे डीएम थियागराजन एसएम म्हणाले की, सर्व जखमींना तातडीने राज्याच्या राजधानीतील पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (पीएमसीएच) मध्ये दाखल करण्यात आले आहे.

गंगा आणि पुनपुन नदीच्या संगमस्थळी  नदीत स्नान करण्यासाठी या महिला पाटणा जिल्ह्यातील फतुहा येथे जात असताना अपघात झाला, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पटना सिव्हिल सर्जनला पीएमसीएचच्या अधीक्षकांशी समन्वय साधण्यास आणि सर्व जखमींवर योग्य उपचार करण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. (Daniyawan-Hilsa road)

सर्व मृत व्यक्ती नालंदा जिल्ह्यातील हिलसा उपविभागातील रेणरी मारवा गावातील रहिवासी होते आणि ते गंगा आणि पुनपुन नद्यांच्या संगमावर गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी पाटणा जिल्ह्यातील फतुहा येथे जात होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (Daniyawan-Hilsa road)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00