कोल्हापूर : प्रतिनिधी : – गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यात गोकुळचे निर्णय अमूल दूध संघावर अवलंबून राहू नयेत आणि जिल्ह्याचे हे स्वातंत्र्य अबाधित राहावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी आणि हितासाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ देत गोकुळ मध्ये एकमुखी नेतृत्वाला पाठबळ द्यावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. (Satej Patil’s tour of Panhala for the Gokul election campaign)
सतेज पाटील यांचा पन्हाळा तालुक्यात दौरा
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आज सोमवारी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीने आज आमदार सतेज पाटील यांनी पन्हाळा तालुक्यातील येवलुज, सातार्डे, पडळ, माजगांव, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, महाडीकवाडी, बिल्वरटेकडी, माजनाळ, काटेभोगांव, कळे,आसगांव, गोठे, तांदुळवाडी, पुणुत्रे, हरपवडे, खरवडे, घरपण, परकंदळे या गावामधील ठराव धारकांची तसेच दूध उत्पादकांशी संवाद साधला. प्रामुख्याने शहाजी पाटील,दादासाहेब पाटील सरदार पांडुरंग कदम, बाबूराव पाटील, सुरेश पाटील, सागर भोमकर , बाबासाहेब शिंदे , बाजीराव खोत, महादेव मिसाळ, स्नेहदीप पाटील, दिलीप पाटील, रवी चौगुले, दिलीप पाटील,अनिश पाटील, युवराज फाटक,तानाजी डवंग, श्रीधर जाधव , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, आनंदा बेलेकर,सरदार पाटील,पी. डी. पाटील, आनंदा पाटील, वसंत आळवेकर , पी. डी. पाटील,सदाशिव चौगुले या प्रमुख नेत्यांची भेट घेण्यात आली. (Satej Patil’s tour of Panhala for the Gokul election campaign)
पशुखाद्याचे दर नियंत्रणात आणले
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षा मध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. म्हैशीच्या दुधाला १४ रुपये आणि गायीच्या दुधाला १० रुपये दरवाढ देण्यात यश आले. पशुखाद्याचे दर नियंत्रणात ठेवून आणि संघाचा अनावश्यक खर्च कमी करून तो निधी शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात गोकुळ दूध संघाचे स्वांतत्र्य टिकून राहावे आणि गोकुळचे निर्णय अमूलवर अवलंबून राहू नयेत, यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. स्वर्गीय आनंदराव चुयेकर यांनी गोकुळच्या माध्यमातून विकासाचे दालन उघडून दिले. तोच विचार आणि पारदर्शक कारभार पुढे सुरू ठेवण्यासाठी पक्षविरहित गोकुळ दूध संघात राहावा अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्याचे यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केली. पाच-सहा लोकांनी मिळून सुचवलेला कारभार योग्य प्रकारे चालू शकत नाही. गोकुळचा कारभार सुरळीत चालण्यासाठी एका सक्षम आणि एकमुखी नेतृत्वाला साथ देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य शेतकरी कोणत्या पक्षाचा गोकुळ आहे हे पाहून दूध घालत नाही, तर चार पैसे मिळतात म्हणून दूध घालतो. गेल्या पाच वर्षांत राजकीय हेतूसाठी गोकुळचा कधीही वापर केला नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काळात शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी गोकुळचे स्वातंत्र्य आबादी ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी एकमुखी नेतृत्वाला पन्हाळा तालुक्याची दूध उत्पादक शेतकरी साथ देतील असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील ठराव धारक रवी चौगले तसेच देवठाणे येथील दिलीप पाटील यांनी आपली राजकीय भूमिका कायम एकनिष्ठ राहील मात्र सहकारामध्ये संघर्ष करणाऱ्या माणसाबरोबर तसेच सर्वसामान्य गरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार रुपये मिळवून देणाऱ्या पक्ष विरहित सहकार्य टिकवून ठेवणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी बरोबर राहणार असल्याचे सांगितले. यावेळी पन्हाळा तालुका अध्यक्ष निवास पाटील उपाध्यक्ष प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, सुनील पाटील दादासाहेब पाटील, राजू माहुलकर, अर्जुन पाटील, अजित दवंग, शरद मिसाळ, प्रमोद घेर्डेकर सरदार काटकर, युवराज भुयेकर, यासह जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, विलास पाटील, उपसभापती राजेश पाटील, प्रकाश देसाई, एस के पाटील, रामकृष्ण पाटील यांच्यासह पन्हाळा तालुका प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Satej Patil’s tour of Panhala for the Gokul election campaign)