Home » Blog » सागर बंगल्यावर गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

सागर बंगल्यावर गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

by प्रतिनिधी
0 comments
Gautam Adani file photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सागर बंगल्यावर अदांनी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (दि.१०) भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्याबद्दल गौतम अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Gautam Adani)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप आणि गौतम अदानी यांचा मुद्यावरून महायुतीला घेरले होते. धारावीतील जमीन अदानी समुहाला देण्यासाठी विरोधकांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. असा आरोपराहुल गांधी यांनी केला होता. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास धारावीसाठीचा अदानी समुहाचा पुनर्विकास प्रकल्प रद्द करुन धारावीतील नागरिकांना उद्योगा घरे दिली जातील, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00