Home » Blog » पुणे कोल्हापूर हायवे चे काम वर्षभराच्या आत पूर्ण होणार : नितीन गडकरी

पुणे कोल्हापूर हायवे चे काम वर्षभराच्या आत पूर्ण होणार : नितीन गडकरी

by प्रतिनिधी
0 comments
Gadkari's statement regarding Pune-Kolhapur Highway

नवी दिल्ली : पुणे कोल्हापूर महामार्गाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. मुंबई गोवा महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून एप्रिल २०२६ च्या आत रस्ता पूर्ण केला जाईल, यात कोणतीही दिरंगाई होणार नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रलंबित आहे याकडे लक्ष वेधले होते. त्यावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. पुणे ते सातारा या रस्त्याचे काम रिलायन्सकडे होते. आता ते रद्द करुन या कामाचा पुन्हा आढावा आमचा विभाग घेत आहे. पुण्यातील बायपास सर्व्हिस लेनचेही काम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. खंबाटकी घाटातील नव्या दोन बोगद्यापैकी एक बोगदा लवकर सुरू करण्यात येईल. साताऱ्याच्या पुढे कोल्हापूर पर्यंतच्या कामात काही अडचणी आहेत. त्यावर माझी पुढच्या आठवड्यात बैठक आहे. वर्षभराच्या आत काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. (Gadkari’s statement regarding Pune-Kolhapur Highway)

१५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला. त्यावर गडकरी यांनी सभागृहात विस्तृत निवेदन केले. ते म्हणाले, या रस्त्याचे काम २००९ पासून सुरू आहे. यामध्ये अनेक कंत्राटदार बदलले गेले. जमीन अधिग्रहणाचीही समस्या होती. पण आता ८९.२९ टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२६ च्या आत हा रस्ता पूर्ण होईल. यात कोणतीही दिरंगाई होणार नाही असे गडकरी यांनी सभागृहात सांगितले. (Gadkari’s statement regarding Pune-Kolhapur Highway)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00