Home » Blog » Fake identity card : देशात बोगस ओळखपत्र तयार करणारी यंत्रणा; संजय राऊत यांचा आरोप

Fake identity card : देशात बोगस ओळखपत्र तयार करणारी यंत्रणा; संजय राऊत यांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Fake identity card

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार आणि अवैध वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडत असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशात बोगस ओळखपत्रे आणि चलनी नोटा तयार करणारी यंत्रणा कार्यरत असल्याचा गंभीर आरोप शुक्रवारी केला.

पत्रकारांशी बोलताना  ते म्हणाले की, “महाराष्ट्रासह देशभरात आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक कार्ड यांसारखी बोगस ओळखपत्रे तयार होत आहेत. नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोगस नोटांचा प्रश्न सुटेल आणि दहशतवादाला आळा बसेल, असा दावा केला होता. मात्र, नोटाबंदीनंतरही बोगस नोटांचा सुळसुळाट कायम आहे. यावर मोदी आणि अमित शाह यांनी काय कारवाई केली?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

(Fake identity card)

 उद्धव आणि राज ठाकरे आज सातव्यांदा एकत्र आले, मात्र युतीची घोषणा न झाल्याबद्दल  ते म्हणाले, “उद्धव आणि राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र काम करत आहेत, एकत्र भूमिका मांडत आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारण करीत आहेत. युतीबाबत योग्य वेळी ते स्वत: बोलतील”, (Fake identity card)

फडणवीस स्टार नव्हे, तर सुपरस्टार प्रचारक 

खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहार दौऱ्यावरही खोचक टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यावर राऊत म्हणाले की, “फडणवीस स्टार नव्हे, तर सुपरस्टार प्रचारक आहेत. बाकी सगळे स्टार असतील, एक स्टार, दोन स्टार, पण फडणवीस सुपरस्टार आहेत. त्यामुळे त्यांचा अपमान करू नका. महाराष्ट्राचा माणूस बिहारमध्ये चालला आहे. जसे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात, तसेच इतर राज्यांचे नेतेही येतात. भाजपामध्ये आता जन्मत:च स्टार निर्माण होतात”, असा टोलाही त्यांनी लगावला. (Fake identity card)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00