Home » Blog » Fadnavis slams Rahul : राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

Fadnavis slams Rahul : राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Fadanvis slams Rahul

मुंबई : प्रतिनिधी : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. त्याचवेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.(Fadnavis slams Rahul)

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभाराच्या प्रस्तावादरम्यान केला होता.  तसेच त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांआधी मोठ्या संख्येने वाढलेल्या मतदारांचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

त्यांच्या या आरोपांना फडणवीस यांनी ‘एक्स’वर उत्तर दिले. “महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा! छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीर सावरकर यांच्या भूमीचा तुम्ही अपमान केला आहे. तुमचा पक्ष पराभूत झाल्याने तुम्ही महाराष्ट्रातील जनतेने एनडीएला दिलेल्या लोकशाही जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे,” असे फडणवीस यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Fadnavis slams Rahul)

ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या पराभवाचे चिंतन करण्याऐवजी, राहुल गांधी ‘निंदा’ करत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे.

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभाराच्या प्रस्तावादरम्यान नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने जोरदार कामगिरी केली. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यान राज्याच्या मतदार यादीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली. ही वाढ हिमाचलच्या लोकसंख्येइतकी आहे. या डेटाची माहिती निवडणूक आयोगाकडे मागितली. मात्र ती दिली नाही, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. (Fadnavis slams Rahul)

राहुल यांनी जूनच्या सार्वत्रिक निवडणुका आणि नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान जवळपास ७० लाख नवीन मतदार अचानक वाढले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले, याकडे लक्ष वेधले. (Fadnavis slams Rahul)

आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीच्या पुनर्रचनेवरही मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा प्रकार लोकशाही संस्था कमकुवत करण्याचा आहे, असा आरोपही केला होता.

तसेच पंतप्रधान मोदी यांना डोनाल्ड ट्रमप यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात यावे यासाठी परराष्ट्रमंत्र्यांना अमेरिकेला पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी केंद्राच्या परराष्ट्र धोरणाच्या हाताळणीवर जोरदार टीका केली. चिनी घुसखोरीबाबत भारतीय लष्करप्रमुखांचे विधान पंतप्रधान मोदींच्या भूमिकेच्या विरोधात असल्याचा दावा करत त्यांनी सीमा सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला होता.

हेही वाचा :

महाराष्ट्रात अख्ख्या हिमाचलएवढे मतदार वाढले कसे?

भाजपकडून पोलिसांचा गैरवापर होण्याची शक्यता

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00