Home » Blog » संसदेत ड्रामा नको, डिलिव्हरी द्या; पंतप्रधानांचे विरोधकांवर टीकास्त्र

संसदेत ड्रामा नको, डिलिव्हरी द्या; पंतप्रधानांचे विरोधकांवर टीकास्त्र

by प्रतिनिधी
0 comments
Don't want drama deliver

नवी दिल्ली : “विरोधकांनी आपले मुद्दे उचलून धरले पाहिजेत. त्यांनी पराभवाच्या निराशेतून बाहेर पडावे. एक-दोन पक्ष तर असे आहेत, जे पराभवाला पचवू शकत नाहीत. पराभवातून आलेली निराशा वाढू देऊ नका, तर विजयी लोकांनी अहंकार डोक्यावर घेऊ नका. नाटकं करण्यासाठी खूप जागा आहेत. पण, इथे ड्रामा नको तर डिलिव्हरी हवी आहे. संपूर्ण देशात जाऊन घोषणाबाजी करा. इथे घोषणाबाजी नव्हे तर धोरणांवर भर द्या. नकारात्कतेला मर्यादेत ठेवून राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्न करा.” असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला.  (Don’t want drama, deliver. PM criticism).

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांचा समाचार घेतला.

बिहारचा निकाल पाहून विरोधक चिंतेत

पंतप्रधान मोदी म्हणाले, “संसदेचे हिवाळी अधिवेशन ही फक्त एक परंपरा नाही. हे अधिवेशन भारताला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम करेल. नुकतेच बिहार विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. लोकांनी मतदानातून लोकशाहीची सर्वात मोठी ताकद दाखवून दिली. विरोधी पक्ष मात्र बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून चिंतेत आहेत.” असे म्हणत त्यांनी पुन्हा विरोधकांवर टीका केली. “भारत लोकशाही जगत आला आहे, भारत म्हणजेच लोकशाही आहे आणि ही गोष्ट वारंवार सिद्ध होत आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली.” असेही ते पुढे म्हणाले. (Don’t want drama, deliver. PM criticism).

जनतेत नाकारलेले संसदेत येऊन राग व्यक्त करतात

“गेल्या काही काळात आपल्या संसदेचा गैरवापर झाला आहे. काही लोकांनी निवडणुकीच्या तयारीसाठी तर काहींनी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी संसदेचा वापर केला आहे. आम्ही पाहात आहोत की काही राज्यांमध्ये जिथे काही पक्ष आणि नेते सत्तेत आले, पण, सत्ता मिळाल्यानंतरही त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यापैकी काहीजण जनतेचा सामना करण्यात असमर्थ ठरत आहेत. तेच लोक जनतेला सांभाळण्याऐवजी इथे संसदेत येऊन सगळा राग व्यक्त करत आहेत. काही खासदारांनी त्यांच्या राज्यांमधील अंतर्गत संघर्ष आणि राजकारण संसदेत आणून संसदेला त्यांच्या भांडणाचे व्यासपीठ बनवले आहे. ही एक अस्वस्थ परंपरा रुजवली जात आहे जी देशासाठी योग्य नाही.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. (Don’t want drama, deliver. PM criticism).

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00