Home » Blog » दादांना अनुभव आहे…

दादांना अनुभव आहे…

शिंदे - अजित पवारांतील कोपरखळीने राजभवन हास्यकल्लोळात !

by प्रतिनिधी
0 comments
Eknath Shinde

मुंबई : प्रतिनिधी : महायुती-२ सरकारचे कॅप्टन हे देवेंद्र फडणवीसच असणार आणि मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचे सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट झाले. मात्र फडणवीस यांनी अन्य नेत्यांसमवेत राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पद स्वीकारण्याबाबत शिंदे व अजित पवार यांच्यातील कोपरखळी चर्चेचा विषय ठरली. ‘त्यांचे माहित नाही पण मी मात्र शपथ घेणार आहे,’ असे पवारांनी सांगितल्यावर शिंदेंनी ‘दादांना शपथ घेण्याचा अनुभव आहे. सकाळी घेतली होती. आता संध्याकाळी घेतील,’ असे प्रत्युत्तर दिले, त्यावर उपस्थितांत हास्यकल्लोळ उडाला. (Eknath Shinde)

भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी विधिमंडळ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली. पक्षाचे निरीक्षक म्हणून आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी त्यांची घोषणा केली. त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांसमवेत राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना गुरुवारी शपथविधीसाठी निमंत्रित केले. त्यानंतर राजभवनातच तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिका स्पष्ट केली. (Eknath Shinde)

फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी, अशी शिवसेनेबरोबरच महायुतीतल्या नेत्यांची इच्छा आहे. आपणही त्यांना त्यासाठी विनंती केली आहे. ते सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्रिपद हे एक टेक्निकल अरेंजमेंट आहे. आम्ही तिघे मिळवून एकत्रित चांगले सरकार देऊ, असेही त्यांनी सांगितले. त्यावर पत्रकारांनी शिंदे यांना मंत्रिमंडळात सहभागी होणार का?, अशी विचारणा केल्यावर थेट उत्तर न देता तुम्ही जरा दम काढा. जे काही आहे ते संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. कोण शपथ घेणार कोण शपथ घेणार नाही हे सर्व काही सांगितलं जाईल, असे ते म्हणाले. त्याचवेळी अजित पवारांनी  ‘त्यांचे माहीत नाही आपण मात्र शपथ घेणार आहोत. आपण थांबणार नाही,’ असे म्हटल्यावर उपस्थितांत एकच हशा पिकला. शिंदे यांनी त्यांना थांबवत ‘दादांना सकाळच्या शपथविधीचा अनुभव आहे. आता ते संध्याकाळच्या शपथविधीचा अनुभव घेतील,’ अशी कोपरखळी मारताच हास्यकल्लोळ उडाला.

फडणवीसांना माझा पूर्ण पाठिंबा : शिंदे

आम्ही राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. गुरुवारी आझाद मैदानात शपथविधी आहे. अडीच वर्षांपूर्वी इथेच फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून माझ्या नावाची शिफारस केली. आणि फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे दिले आहे, असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00