Home » Blog » महायुतीच्या ‘दणदणीत विजया’चे श्रेय लाडक्या बहिणींना : एकनाथ शिंदे

महायुतीच्या ‘दणदणीत विजया’चे श्रेय लाडक्या बहिणींना : एकनाथ शिंदे

महायुतीची सत्ता स्थापनेची तयारी

by प्रतिनिधी
0 comments
Eknath Shinde file photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेतील पराभव विसरत महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीने मोठा कमबॅक केला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी माझ्या लाडक्या बहिणींचे मनापासून अभिनंदन करतो. राज्यात महायुती सरकारने केलेल्या कामांची पोचपावती मिळाली आहे. या दणदणीत विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. राज्यातील जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.  (Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांनी नेत्यांसह मिठाई वाटप करून आनंद साजरा केला. पुढे बोलताने एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे अजून ठरलेले नाही. निवडणुकीचा स्पष्ट निकाल येवू द्या. जसे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो. तसेच महायुती म्हणून एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेवू असे एकनाथ शिंदे म्हणाले.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महायुतीने राज्यातील २८८ पैकी २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी २० जागांवर आघाडी घेतली आहे.  दरम्यान निकाल स्पष्ट होताच महायुतीने सत्ता स्थापन करण्याची तयारी केली आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00