Home » Blog » कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार?

by प्रतिनिधी
0 comments
Chief Minister of Karnataka will resign this afternoon

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग  मोकळा होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात नेतृत्व बदल करण्याचा निर्णय काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तीन दिवसापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि  उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या बैठकीत पक्षाची रणनिती ठरवण्यात आली. कर्नाटकातील नेतृत्वबदल करण्यास सिद्धरामय्यांनी तयारी दर्शवली आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. (Chief Minister of Karnataka will resign this afternoon)

आज शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी शिवकुमार यांचे स्वागत केले. शिवकुमार त्यांच्या पाया पडले आणि आशीर्वाद मगितला. दोघांनी गळाभेटही घेतली. त्यामुळे संभाव्य नेतृत्वबदलाचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी सर्व मंत्र्यांचे आभार मानले. दुपारी साडेतीनपर्यंत ते राजीनामा देणार आहेत असे कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले. (Chief Minister of Karnataka will resign this afternoon)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00