Home » Blog » CJ Gawai Reacts : मला धक्का बसला…. : सरन्यायाधीश गवई

CJ Gawai Reacts : मला धक्का बसला…. : सरन्यायाधीश गवई

by प्रतिनिधी
0 comments
CJ Gawai Reacts

नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टात बूट फेकण्याच्या प्रकरणावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेने मला धक्का बसला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (CJ Gawai Reacts)

सोमवारी (दि.६) सुप्रिम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर सुनावणी सुरू असताना वकील राकेश किशोर याने त्यांना बुट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित सुरक्षित सुरक्षारक्षकांनी माथेफिरु वकिलांवर झडप घालून पकडले. त्याला न्यायालयातून बाहेर नेत असताना त्याने ‘सनानत का अपमान नही सहेंगा हिंदूस्थान’ अशी घोषणाबाजी केली होती. सरन्यायाधीशांनी त्याला माफ केल्याने दिल्ली पोलिसांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर वकील ७१ वर्षीय राकेश किशोर याने पश्चाताप व्यक्त न करता स्वत:च्या कृतीचे समर्थन केले होते. (CJ Gawai Reacts)

माझ्या भावाला आणि मला धक्का बसला

या घटनेने देशभर खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश गवईंना फोन करुन माहिती घेत घटनेचा निषेध केला. देशभर या घटनेचा सार्वत्रिक निषेध झाला. या घटनेनंतर प्रथमच सरन्यायाधीश गवई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लाईव्ह लॉ च्या वृत्तानुसार सरन्यायाधीशांनी असे म्हटले आहे की. माझ्या भावाला आणि मला सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे मोठा धक्का बसला आहे. माझ्यासाठी हे प्रकरण विस्मृतीत गेले आहे. सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तीशी चर्चा करत असताना सरन्यायाधीश गवई यांनी या प्रकरणांवर आपले मत स्पष्ट केले आहे. (CJ Gawai Reacts)

व्यक्तीवर नव्हे, संस्थेवर प्रहार

गवई यांच्यासोबत पीठसनावर असलेल्या न्यायमूर्ती उज्जल भुईया यांनीही घटनेवर भाष्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, सरन्यायाधीश गवई हे देशाचे मुख्य न्यायाधीश आहेत. हा काही विनोदाचा विषय नाही. ही घटना केवळ व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण संस्थेवर प्रहार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मत व्यक्त करताना ही घटना अक्षम्य आहे. मात्र न्यायालयाने दाखवलेले संयम आणि उदारता प्रेरणादायक आहे.  (CJ Gawai Reacts)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00